Manohar Joshi Health Update : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या प्रकृत्तीबद्दल हिंदुजा रुग्णालयाने दिली महत्त्वाची माहिती

Manohar Joshi News : मनोहर जोशी यांच्यावर सध्या डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे.
Manohar Joshi News :
Manohar Joshi News :Sarkarnama

Manohar Joshi Health Update News : माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात हिंदुजा रुग्णालयाने महत्त्वाची माहीत दिली आहे.

काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत, अशी रुग्णालयाने दिली आहे. जोशी यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.

Manohar Joshi News :
Manohar Joshi Health Update: मोठी बातमी | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; रूग्णालयात दाखल...

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जोशी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांना ब्रेन ट्यूमरचा त्रास असल्याने प्रकृती चिंताजनक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे.

Manohar Joshi News :
Karnataka Politics : 'कर्नाटकमध्ये सिद्धरामय्याच पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार; अडीच-अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही'

गेल्या काही काळापासून मनोहर जोशी हे राजकारणात सक्रिय नाहीत. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Former CM) खासदार, केंद्रीय उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com