समर्थ रामदासांच्या जन्मगावातील मूर्ती चोरीबाबत फडणवीसांचे विधानसभेत कारवाईचे आदेश

Devendra Fadnavis : जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामी स्वत: ज्या मूर्तींची पूजा करायचे, त्या 450 वर्षे जुन्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.
maharashtra assembly monsoon session live updates
maharashtra assembly monsoon session live updatessarkarnama

मुंबई : समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas)जन्मगावी जालन्या जिल्ह्यात ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या संदर्भातील मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज (सोमवारी) उपस्थित केला. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेचा तपास केला जाईल. अज्ञात चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली.

आज पहाटेच्या सुमारास या मूर्ती चोरी केल्या आहेत. जवळपास या मूर्ती 700 वर्षांपूर्वीच्या होत्या. महाराष्ट्रासह मुंबईतून अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी”, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली होती.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या घटनेची माहिती मिळताच मी पोलीस महासंचालकासोबत चर्चा केली आहे. त्यांना या घटनेची दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,”

maharashtra assembly monsoon session live updates
Monsoon Session :'चला, काही तरी मिळालं' ; सभागृहात शिरसाटांना आमदारांचा टोला

जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामी स्वत: ज्या मूर्तींची पूजा करायचे, त्या 450 वर्षे जुन्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्ती देखील चोरीला गेल्या आहेत.

जिल्हा उपपोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह डॉग स्कॉडसह फिंगर प्रिंट एक्स्पर्टची टीमही घटनास्थळी दाखल झाली. घटनेची संपूर्ण चौकशी पोलिसांकडून केल्या जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही ही पोलिसांकडून तपासले जात असल्याची माहिती समोर आली.

घनसावंगी तालुक्यातल्या समर्थ रामदास यांचं जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरात चोरी मंदिराचे वैभव असलेल्या मूर्त्याची चोरी, श्रीराम,लक्षण आणि सीता यांच्या मूर्ती सह सहा मूर्त्याची चोरी केल्याची घटना समोर आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com