Ramdas Athwale & Uddhav Thackearay
Ramdas Athwale & Uddhav ThackearaySarkarnama

मुंबईत इतिहासाची पुनरावृत्ती होणार; भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर होईल..

Ramdas Athavale|RPI|Shivsena|Uddhav Thackeray|BMC: मुंबईत शिवसेनेची सत्ता सन 1990 मध्ये आरपीआय-काँग्रेस युतीने उलथवून लावली होती.

मुंबई : मुंबईत शिवसेनेची (Shivsena) सत्ता सन 1990 मध्ये आरपीआय (RPI) काँग्रेस (Congress) युतीने उलथवून लावली होती. तेंव्हा आरपीआयचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मुंबईचे महापौरपद (Mayor) आरपीआयला त्यावेळी लाभले होते. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्ही करणार असून भाजप (BJP) सोबत युती करून मुंबईत शिवसेनेची सत्ता उलथवून भाजप आरपीआयची सत्ता आणणार आहोत.

मुंबईत भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर होईल. तसेच पिंपरी चिंचवडमध्येही आरपीआय चा उपमहापौर होईल. राज्यभरातील सर्व महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करणार असून सर्व महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युतीची सत्ता स्थापन होईल या संकल्पाने कामाला लागा, असे आवाहन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले आहे.

Ramdas Athwale & Uddhav Thackearay
मशिदींसमोर भोंगे लावायवा अमित ठाकरेंना पाठवा; सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना आव्हान

पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील मैदानात रिपब्लिकन पक्षाचा सत्तासंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते सर्व बोलत होते. यावेळी मेळावा आयोजक रिपाइंचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष स्वप्नील कांबळे तसेच रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, परशुराम वाडेकर, चांद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, कुणाल व्हावळकर, पिंपरी विधान सभा अध्यक्ष दादा शिरोळे, गंगाधर आंबेडकर. अजीज शेख, सुधाकर वारभुवन, इलाबाई ठोसर आदी उपस्थित होते.

Ramdas Athwale & Uddhav Thackearay
'थोरात माझे आदर्श मात्र मी माझ्या पत्रावर ठाम'

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा डॉ बाबासाहेबांचा वारसा आहे. हा रिपब्लिकन वारसा काही वारसदार मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. रिपब्लिकन नाव पुसण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही रिपब्लिकनचा वारसा मिटू देणार नाही. आम्ही रिपब्लिकन पक्ष भारत देशात सर्व राज्यांत मजबुतीने पोहोचविला आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत केवळ 180 मतांनी रिपाईचा उमेदवार पराभूत झाला. मात्र आम्ही तिथे पुनर्मतमोजणीची मागणी केली आहे. त्यात रिपाईचा विजय होईल,असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन वारसा पुढे घेऊन जाऊ, असा निर्धार आठवलेंनी यावेळी व्यक्त केला. तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून या युतीमध्ये दोघांत तिसरा राज ठाकरेंना विसरा, असा भाजपला सल्लाही आठवलेंनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com