Devendra Fadnavis On Badlapur Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'पोलिसांनी...'

Badlapur Sexual Assault Accused Akshay Shinde Encounter Case : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावत तीन राऊंड फायर करण्यात आले.त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या फायरिंगमध्ये आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केल्याची माहिती समोर येत आहे.
Devendra Fadnavis on badlapur.jpg
Devendra Fadnavis on badlapur.jpgSarkarnama
Published on
Updated on

Badlapur Encounter Case : बदलापूरमधील एका शाळेत चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.त्यानंतर बदलापूरमध्ये 10 तासांचं रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं. तसेच पीडित मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी काही तास पोलिस ठाण्यात तत्काळ बसवून ठेवण्यात आलं होतं.

या सर्व घटनेमुळे समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती. पण संशयाच दाट धुकं असलेल्या या प्रकरणात सोमवारी संध्याकाळी एक खळबळजनक घटना समोर आली होती. बदलापूर (Badlapur) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावत तीन राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या फायरिंगमध्ये आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केल्याची माहिती समोर येत आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, त्याच्या पूर्वपत्नीने त्याच्याविरुद्ध लैंगिक तक्रार केली होती.त्याच्या चौकशीसाठी वॉरंट काढून त्याला घेऊन जात होते.पण त्याचवेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर फायरिंग केले. यात एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फडणवीस म्हणाले, एपीआय निलेश मोरे यांच्यावर झालेल्या फायरिंगनंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा हेच विरोधी पक्ष आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. त्यामुळे ही घटना कोणतेही फेक एन्काऊंटर झालेले नाही. अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

Devendra Fadnavis on badlapur.jpg
Badlapur rape case Update : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळ्या झाडल्या; आत्महत्या की एन्काऊंटर?

फडणवीस म्हणाले, एपीआय निलेश मोरे यांच्यावर झालेल्या फायरिंगनंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे.

ज्यावेळी ही अत्याचाराची घटना घडली तेव्हा हेच विरोधी पक्ष आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. त्यामुळे ही घटना कोणतेही फेक एन्काऊंटर झालेले नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपास येथे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी सोबत असलेल्या पोलिस निरीक्षकाची बंदूक हिसकावली. त्यानंतर त्याने तीन राऊंड फायर केले.त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या फायरिंगमध्ये अक्षय गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

बदलापूर बलात्कार प्रकरणात अक्षय शिंदे याची चौकशी सुरू होती. त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस सोमवारी संध्याकाळी तळोजा रुग्णालयात दाखल झाले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Devendra Fadnavis on badlapur.jpg
Laxman Hake : संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके भडकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com