ठाकरेंना धमकीचे कर्नाटक कनेक्शन विधानसभेत गाजले अन् थेट एसआयटीची घोषणा

आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने अटक केली आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama
Published on
Updated on

मुबंई : शिवेसनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने (Cyber Cell) अटक केली आहे. हा मुद्दा गुरूवारी विधानसभेत गाजला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीकडून ठाकरेंसह इतर आमदार व नेत्यांना आलेल्या धमकीची चौकशी केली जाणार आहे.

आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्याचे जयसिंग राजपूत (Jaisingh Rajput) असं नाव असून तो अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फॅन असल्याचा दावा करत आहे. कर्नाटकातील बंगलुरू येथून जयसिंगला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा मुद्दा शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागण केली. तसेच त्यांनी या धमकी प्रकरणावरून अप्रत्यक्षपणे थेट भाजपकडे (BJP) बोट दाखवले.

Dilip Walse Patil
आमदार नितेश राणे, हाजिर हो! पोलिसांनी नोटीस धाडल्यानं राजकारण तापलं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar), छगन भुजबळ, नाना पटोले या नेत्यांनीही या चर्चेत भाग घेतला. सर्वांनीच धमकीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगत चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर वळसे पाटील यांनी ठाकरे यांच्यासह इतर आमदार, नेत्यांना आलेल्या धमक्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच ही समिती धमक्या रोखण्यासाठी उपाययोजनाही सुचवणार असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जयसिंग राजपूत याने आदित्य ठाकरेंना धमकीचे व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. यातील एका मेसेजमध्ये त्याने ठाकरे यांच्यावर सुशांतसिंहच्या हत्येचा आरोप केला आहे. ता. 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री ठाकरे यांना सुरूवातीला एक मेसेज आला. त्यामध्ये हा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याने तीन फोन केले. पण ठाकरेंनी ते फोन घेतले नाहीत.

Dilip Walse Patil
वीस जणांचे जबाब घेऊनही पोलिसांकडे वानखेडेंविरोधात एकही नाही पुरावा!

त्यानंतर आरोपीने आदित्य यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी हा बंगलुरू येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक बेंगलुरू येथे रवाना झाले. तिथेच त्याला अटक करण्यात आली.

तुम्ही सुशांतसिंह राजपूतला मारले आता पुढचा नंबर तुझा असेल, असं आरोपी आदित्य ठाकरे यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते. काही मेसेजमध्ये ठाकरे यांच्याविषयी त्याने अपशब्दही वापरले होते. तो स्वत:ला सुशांतसिंहचा फॅन असल्याचे सांगत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com