सहकारी सोसायटींना पोलीस आयुक्त पांडेंनी दिली पुन्हा ताकीद..गुन्हा दाखल करणार

नियम मोडलयास संबधित विकसकावर गुन्हा दाखल केला जाईल, असे पांडे म्हणाले.
Sanjay Pandey
Sanjay PandeySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey)यांनी दिला आहे. पांडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून रविवारी नागरिकांशी संवाद साधला. नवरा-बायकोमधील वाद, ज्येष्ठांच्या समस्या, सोसायटीतील पाणी, वीज कारवाई आदी विषयावर पांडे यांनी संबधितांना काही सूचना दिल्या.

''मुंबईतील अनेक को आँप सोसायटींमध्ये मेटेनेन्स न भरल्याने कमिटीकडून वीज तोडणी किंवा नळजोड तोडणीची कारवाई केली जात आहे. हे नियमाला धरून नाही त्या मुलभूत गरजा आहेत. असे प्रकार वृद्धा़सोबत विशेषत: घडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. असे प्रकार समोर आल्यास थेट संबधित व्यक्ती किंवा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, '' असा आदेश पांडे यांनी रविवारी दिला.

Sanjay Pandey
शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक ; विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार

''विकासकांना इमारतीच्या कामाच्या वेळा या आखून दिलेल्या आहेत. त्यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच कामे करावी. मी पून्हा त्यांना ताकीद देत आहे. नियम मोडलयास संबधित विकसकावर गुन्हा दाखल केला जाईल,'' असे पांडे म्हणाले.

पांडे म्हणाले, ''मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यानंतर अनेक ठिकाणी तरुण मैदानात खेळण्यासाठी बाहेर पडत आहेत, विविध ठिकाणी विविध स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. मात्र या स्पर्धेच्या वेळी मोठ मोठे डिजे लावून, काँमेंट्री आणि गाणी वाजवत ध्वनी प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आयोजकांनी किंवा तरुणांनी असे करू नये स्पिकर लावायचा झाल्यास त्याचा इतरांना त्रास होणार नाही ऐवढा आवाज ठेवा. अन्यथा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत,''

Sanjay Pandey
शिवसेनेची नवी इनिंग ; मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आता क्रिकेटच्या पिचवर..

''मागील काही दिवसात छोट्या छोट्या कारणांवरून नवरा-बायकोमधील वाद हे पोलीस ठाण्यांपर्यंत येत आहेत. माझी विनंती आहे त्या जोडप्याना घरातले वाद घरातच सोडवा, विषय गंभीर असल्यास नक्कीच पोलिस (mumbai police)सहकार्य करतील,'' असे पांडे यांनी सांगितले.

रस्त्यावरून उलट दिशेने गाडी चालवणाऱ्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा असे प्रकार वारंवार घडत आहेत. आतापर्यंत २७९ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तरुणांना विशेष त्यांच्या पालकांना विनंती आहे आपल्या मुलास वाहतूकीचे नियम पालन करण्याची समज आपण द्यावी. नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, यामुळे मुलाचे आयुष्य उद्धवस्त होईल, पासपोर्ट, नोकरी, या सारख्या ठिकाणी मुलांना भविष्यात हा गुन्हा अडसर ठरू शकतो,''

''पोलीस बांधवांना ही आवाहन आहे. तब्येतीची काळजी घ्या, रोजच्या दैनदिन कामातून फक्त ३० ते २० मिनिटं काढून व्यायाम करा,ज्याने करून आपणही थोडं फिटनेसमध्ये रहाल, पौष्टिक अन्न खा,'' असा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला.

''पदपथावरील फेरीवाल्याचा मोठा प्रश्न मुंबईत आहे. याच्याबाबत कुठलीही गाईडलाइन नाही, यासाठी आम्ही यांच्या नेत्यासोबत बैठका घेतल्या आहेत. लवकरच अधिकृत फेरीवाल्या़ची एका शासकीय समितीतर्फे गणना करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करू, या गणनेत जे फेरीवाले अनधिकृतरित्या पदपथावर जागा अडवतील त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली.

''२६ /११ हल्यात शहिद झालेल्या तुकाराम ओंबाळे यांच्या गिरगाव येथील स्मृती स्थळी लवकरत इंग्रजीतही त्याच्या कर्तुत्वाची माहिती देणारी पाटी लावली जाईल, ज्यामुळे परदेशातून मुंबईत फिरायला येणार किंवा मराठी न समजणाऱ्या नाही त्यांच्या कर्तुत्वाची माहिती समजेल,'' असे पांडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com