Rashmi Shukla Phone Tapping : गोपनीय कागदपत्रे फडणवीसांकडे कशी गेली समजत नाही; सीबीआयचा कोर्टात खुलासा

Devendra Fadnavis On Phone Tapping Case : या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याच समजते
Rashmi Shukla Phone Tapping :
Rashmi Shukla Phone Tapping :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. याच आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात प्रचंड गाजले. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. 'फोन टॅपिंग' मध्ये वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी रश्मी शुक्लांना मोठा दिलासा न्यायालयाने दिला आहे. (Rashmi Shukla Latest News)

Rashmi Shukla Phone Tapping :
Sushma Andhare on Crime : अंधारेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस; म्हणाल्या, कल्याण डोंबिवलीत गुन्हेगार मोकाट

फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी न सापडल्याने सीबीआयकडून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गुन्हा खरा आहे, गोपनीय कागदपत्रे लीक झाली आहेत, मात्र या प्रकरणात आरोपींचा शोध लागत नाही, आरोपी सापडत नाहीत असा सीबीआयचा दावा होता, तो कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे. दरम्यान गोपनीय कागदपत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कशी आणि कधी गेली, हे समजून येत नाही, असंही सीबीआयने कोर्टाला सांगितलं आहे.

गोपनीय कागदपत्रे एसआयडी कार्यालयातून अनोळखी व्यक्तिने चोरी केली असून, काही पत्रांवर दुबार लिखाण झाल्याच दावा सीबीआयने दावा केला आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याच समजते, याबाबत एका मराठी वृत्तवाहिनेने बातमी दिली आहे.

Rashmi Shukla Phone Tapping :
Beed NCP Sabha News : बीडच्या सभेत अजितदादा करणार मोठा धमाका; कार्यकर्त्यांबरोबर मुंबईत खलबतं

याबाबत सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने ‘फोन टॅपिंग’प्रकरण कायमचे बंद झाले आहे. या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

Rashmi Shukla Phone Tapping :
Sharad Pawar News : निवडणुकीत भाजपला लोक 'जागा' दाखवतील; शरद पवारांनी साधला निशाणा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com