Sharad Pawar News : निवडणुकीत भाजपला लोक 'जागा' दाखवतील; शरद पवारांनी साधला निशाणा !

Sharad Pawar On Local Body Election : "देशपातळीवरील संघटनेत फूट नाही, काही आमदार पक्षातून बाहेर गेल्याने पक्षात फूट पडत नाही. "
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचा पुनरुच्चार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापुरात केला. "आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तुस्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत, देशपातळीवरील संघटनेत फूट नाही, काही आमदार पक्षातून बाहेर गेल्याने पक्षात फूट पडत नाही. मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत," असे सांगत पक्षात फूट नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
EVM Machin Hacking : EVM मशीन हॅक करून भाजप निवडणुका जिंकते, निवडणूक आयोगही हातातील बाहुली : ठाकरे गटाने पुरावाच दिला

पवार पुढे म्हणाले,"राहुल गांधींचा पहिला 'भारत जोडो' दौरा झाला, आमचं निरीक्षण असं आहे की, विरोधकांची स्थिती त्याच्यामुळे सुधारली. दुसरा जो टप्पा आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षांना फायदा निश्चितच होईल. लोकांना संघटीत करणं, त्यांच्या प्रश्नांची मांडणी करणं, याचा फायदा होतोय."

"राष्ट्रवादी काँग्रसचा अध्यक्ष मी आहे. राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे. जे आम्ही मांडतो तीच वास्तव भूमिका आहे," असेही स्पष्टीकरण पवारांनी दिले.

Sharad Pawar News
EVM Machin Hacking : EVM मशीन हॅक करून भाजप निवडणुका जिंकते, निवडणूक आयोगही हातातील बाहुली : ठाकरे गटाने पुरावाच दिला

"निवडणुका या घेतल्याच पाहिजेच. महापालिकेच्या निवडणुका किती दिवस प्रलंबित आहेत. भाजपला भिती वाटते निवडणुका घेण्याची, लोक भाजपला त्यांची जागा दाखवतील. त्याचा परिणाम पुढील निवडणुकातही होईल, अशी चिंता भाजपला वाटत असावी," अशी टीकाही शरद पवारांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com