Raj Thackeray : गेली दोन वर्ष दहावीत नापास झाल्या सारखं वाटतंय..; राज ठाकरे असं का म्हणाले?

Thane News : ''भाजपनेही लक्षात ठेवावं भरती सुरु हे पण आहोटी येणार आहे''
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन सोहळा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीवरून राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली.

ठाकरे म्हणाले, ''महापालिका निवडणुका कधी लागणार माहिती नाही. पण आता असं वाटतंय दहावीला नापास झालोय. काय वाटतं कधी मार्च? मार्च गेलं की मग ऑक्टोबर? ऑक्टोबर गेलं की पुन्हा मार्च?, हे असंच सुरू आहे'', अशी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा झाला.

Raj Thackeray
Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, लवकरच सत्तेत असणार; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

ते पुढे म्हणाले, ''बहुमत हाती यायला भाजपाला १९५२ ते २०१४ इतका वेळ वाट पाहावी लागली. मात्र, मनसेला एवढा वेळ लागणार नाही. मी बहुमत लवकर आणणार. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही. मी फक्त आशा दाखवत नाहीये. मला माहिती आहे.

आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार'', असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

Raj Thackeray
MNS : सांगितलं होतं ना आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही, शेवटी मुख्यमंत्रीपद गेलं ना; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

भाजपबद्दल बोलतांना ठाकरे म्हणाले, ''भाजपनेही लक्षात ठेवलं पाहिजे त्यांची भरती सुरु आहे. पण आहोटी येणार आहे. भरती-ओहोटी येतच असते'', असं म्हणत त्यांनी भाजपलाही इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com