तथागतांचे आभार मानत IAS वैभव वाघमारे यांचा तडकाफडकी राजीनामा

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासींसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या IAS वैभव वाघमारे यांनी अचानक राजीनामा दिला आहे.
IAS Vaibhav Waghmare, Melghat news, Amravati News Updates
IAS Vaibhav Waghmare, Melghat news, Amravati News Updates
Published on
Updated on

अमरावती : अमरावती (Amaravati ) जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासींसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या IAS वैभव वाघमारे यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वाघमारे यांनी फेसबुक अकाउंटवरून राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा केंद्राकडे पाठवला असून लवकरच या जबाबदारीतून मुक्त केले जाईल, असंही म्हटलं आहे. (IAS Vaibhav Waghmare)

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले वैभव वाघमारे (Vaibhav Waghmare) हे 2019 च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत. ते मूळचे पंढरपूरचे अअसून वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ पीर येथे परिवक्षाधीन कालावधीत तहसीलदार आणि मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. 2021 मध्ये त्यांची मेळघाटच्या आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

IAS Vaibhav Waghmare, Melghat news, Amravati News Updates
संतोष पाटील यांची सुसाईड नोट सापडली; ग्रामविकास मंत्र्यांवर गुन्हा दाखल

वाघमारे यांनी चार दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट करून राजीनाम्याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, काल देशाच्या सर्वोत्कृष्ट नोकरीचा (IAS) राजीनामा दिला. हे जीवनात काहितरी अजुन चांगले व उदात्त करण्याच्या शोधापोटी केले गेले. निर्णय घेणे थोडेसे कठीण होते. या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार. IAS, ( IRS, आणि IRAS) चे आभार, ज्याने फक्त तीन वर्षांत जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला, जो अनुभव मिळण्यासाठी अन्यथा सामान्य आयुष्याचा साधारणपणे 20-30 वर्षांचा कालावधी लागला असता.

अस म्हणलं जात की आयएएस ही देशातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. माझा तर विश्वास आहे की ही जगातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. पण जगात जे सर्वोत्कृष्ट समजले जाते ते एखाद्याला आवडलेच पाहिजे, व त्याने ते आयुष्यभर केले पाहिजे हे आवश्यक आहे का? भारतीय प्रशासकीय सेवा, व सेवेत कार्यरत असलेले चांगले अधिकारी, ज्याना भेटण्याचा व ज्यांचे सोबत काम करण्याचा योग आला त्याचे आभार. तथापि, मला आशा आहे की हा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारला जाईल आणि माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीतून मला मुक्त केले जाईल, असंही वाघमारे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाघमारेंनी अल्पकालावधीत जिंकली मनं

अत्यंत कमी कालावधीतच वाघमारे यांनी आदिवासीबहुल भागातील लोकांची मनं जिंकली आहेत. मोहफुलांच्या बँकेची त्यांची कल्पना अल्पकालावधीतच लोकप्रिय ठरली. मेळघाटातील जवळपास 30 गावांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही बँक 300 गावांमध्ये सुरू करण्याचा संकल्प केला होता. मोहबँक ही एक समिती असून त्यामध्ये जंगलातील विविध वनस्पतींचा वापर कसा करावा याचे सर्वांना प्रशिक्षण दिले जाते. महिला बचत गटांना मोहफुलावर प्रक्रिया करून लाडू, शिरा, बिस्कीट, चटणी, लोणचं, चवणप्राश आदी वस्तू तयार करण्यासाठी या महिलांना प्रशिक्षण दिले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com