Pankaja Munde मुंबई : राजकारणाची पातळी घसरु नये, याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती जे बोलतो त्याचं भांडवल न करणं हीदेखील आपली जबाबदारी आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही महिलेविषयी आदरपुर्वक टीका केली पाहिजे, पण जर ती पातळी घसरत असेल तर ते अयोग्य आहे, अशी प्रतिक्रीया भाजप नेत्या पंकजा मुंडें यांनी दिली आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळेंबाबत बोलताना गलिच्छ भाषेत टीका केली आहे. या टीकेनंतर भाजप महिला नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही यावर भाष्य केलं आहे. महिलांचा अवमान करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळे सत्तार यांनी अशा शब्दात टीका करु नये, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. पण हा प्रकार जिथून सुरु झाला ते म्हणजे पन्नास खोके सत्तार यांच्याकडे आहेत आणि ते मला त्यांनी द्यावेत. या पन्नास खोक्यांवरुन जी राळ उठवली गेली, या पन्नास खोक्यांवरुन ठिकठिकाणी अपमानित करण्याचं काम महाराष्ट्रात सुरु आहे. त्यांच ते प्रत्युत्तर आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी अभिनेत्री कंगना राणावत ला संजय राऊत यांनी अपमानित केलं, पण फडणवीसांच्या सरकारमध्ये आतापर्यंत कोणत्याही नेत्याने, पदाधिकाऱ्यानेही महिलांचा अपमान केला नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळेंबाबत बोलताना जीभ घसरली आहे. सुप्रिया सुळेंना तुम्ही खोके देण्याची ऑफर केली होती. त्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं, यावर काय सांगाल असं सत्तार यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. या वर बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.
सत्तारांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना शब्द मागं घेण्याचा इशारा दिला आहे. चोवीस तासात तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, अन्यथा त्याची जीभ हासडू, असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे महिलांचा सन्मान केला तीच शिकवण राष्ट्रवादीनेही आम्हाला दिली आहे. पण सत्तेचा माज असलेले कृषी मंत्र्यांची वेळ पडली तर मीही सत्तांराना एकेरी आणि अपशब्द बोलू शकतो. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. माही पातळी ओलांडू शकतो. पण ते अजित दादा, पवार साहेब आणि सुप्रिया ताईंना पटणार नाही म्हणून मी संयमाने बोलत आहे. त्यामुळे त्यांनी चोवीस तासात तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.