Abdul Sattar on Sanjay Raut : संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, मी ही देईन; सत्तारांचे आव्हान

Thackeray vs Shinde | शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.
Abdul Sattar on Sanjay Raut : संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, मी ही देईन; सत्तारांचे आव्हान

Abdul Sattar criticizes Sanjay Raut: शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करता अगदी तुटून पडल्याचे दिसतात. 'दैनिक सामना'च्या अग्रलेखातून संपादक संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेला शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उत्तर देताना राऊतांवर अत्यंत अर्वाच्च भाषेत टीका केली आहे. (If Sanjay Raut resigns, I will also resign: Abdul Sattar's challenge)

'' तो (संजय राऊत) (Sanjay Raut) कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला आम्हीच त्याला राज्यसभेवर पाठवले आहे.त्यांची कुत्र्यासारखी अवस्था झाली असून ते रोज सकाळी उठल्यावर आमच्यावर भुंकत असतात. त्यांच्यापेक्षा वाईट आम्हाला बोलता येते.पण आम्ही बोलत नाही. आमचही ४०-४२ वर्षांचं राजकारण आहे. पण ज्या कुत्र्याला आम्ही मतदान करून राज्यभेवर पाठवलं तो आम्हालाच कुत्रे बोलत असेल, तर त्याच्यासारखा महाकुत्रा कुणीही नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

Abdul Sattar on Sanjay Raut : संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, मी ही देईन; सत्तारांचे आव्हान
ATS Arrests Pradeep Kurulkar: कुरुलकरांच्या भोवती एटीएसने फास आवळला; लॅपटॉप अन् मोबाईलचे होणार तांत्रिक विश्लेषण

पण त्याच्यात जर हिमंत असेल तर त्याने राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावं. मी सुद्धा राजीनामा देतो त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. असं खुल आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. एकतर मी सामना वाचत नाही, त्यात वाचण्यासारखं काहीच नसतं. ज्यात काही तथ्य नाही. सामना वाचून काहीही फायदा नाही. 5 ते 10 रुपये खर्च करायचे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Maharashtra Politics)

अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसाने जरा जिभेला लगाम द्यायला पाहिजे. ज्यांच्या मतांनी तुम्ही राज्यसभेवर गेला. याचा जर बिस्मिला करायचा असता तर तेव्हाच केले असत. असा सणसणीत टोलाही सत्तार यांनी लगावला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com