माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर...; खासदाराचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

Eknath Shinde |Devendra Fadavis| महाराष्ट्र शासनाकडून दडपशाही सुरु आहे.
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Rajan Vichare| मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी या पत्रातून केला आहे. आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा गंभीर आरोपही विचारे यांनी केला आहे.

Rajan Vichare| मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी या पत्रातून केला आहे. आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा गंभीर आरोपही विचारे यांनी केला आहे.

Eknath Shinde and Devendra Fadanvis
Andheri By Elelction| भाजपने माघार घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले...

वाचा काय लिहीलं आहे राजन विचारेंनी या पत्रात

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेठ गेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर वर कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना टोसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिखावणीखोर प्रकार कथाकथीत स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला

अशा उपरोक्त परिस्थीततच माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई,मीरा भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने माला वारंवार रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. त्यामुळेच मला २०१९ च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत ७ लाख ४० हतार ९६९ मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटते.

आश्चर्य म्हणजे शिंदे गटातील ज्यांना शासकीय किंवा राजकीय उच्च पद नाहीत अशांनाही पोलीस संरक्षणत देण्यात आलेले आहे. माझे अंकरक्षक कपात केल्यामुळे माझ्या व कुटुंबियांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे. दुर्देवाने अशी काही दुर्घटना झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री वर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील. तरी कृपता माझ्या अंतरक्षक पोलीस संरक्षणता वाढ करावी ही नम्र विनंती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com