राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे...

Chandrakant Patil : राज्यात प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या पदांचीही आठवण सोशल मिडीयावर नेटकरी करून करून देत आहेत.
Education
EducationSarkarnama
Published on
Updated on

पुणे : कोरोनाच्यासंकट काळात पालक गमावलेल्या, अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासंबंधीची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रावर अनिष्ट परिणाम झाले. या काळात पालक अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. या विद्यार्थ्यांसाठी आता महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंबंधी पाटील म्हणतात की, "कोरोना काळात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफीचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याची यावर्षीही काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात यावी."

Education
अधिकारी, कर्मचाऱ्यांनो दिवाळी गिफ्ट घ्याल तर सावधान; आयुक्तांनी दिला इशारा...

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून, या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रीयेमध्ये कसलिहील बाधा येऊ नये. यासाठी विद्यापीठांनी आणि अनुदानित महाविद्यालयांनी याकडेही विशेष लक्ष द्यावे, असे पाटील यांनी सुचवले आहे.

एकीकडे पाटील यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असतानाच, राज्यात प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या पदांचीही आठवण त्यांना सोशल मिडीयावर नेटकरी करून करून देत आहेत. याबाबत महेश चोंडे म्हणतात, ‘‘नियमित प्राध्यापक भरती होताना दिसत नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे. महाविद्यालयात जाणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याचीही चिंता असू द्या साहेब.’’ महाराष्ट्रात जवळपास ६० टक्के पेक्षा जास्त अनुदानित प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com