Video - Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांच्या पत्रकारपरिषदेत 'AIMIM' कार्यकर्त्यांनीच घातला राडा!

AIMIM Imtiaz Jaleel Press Conference : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण? ; जलील यांच्या समक्षच पक्षावार गंभीर आरोपही केला गेला आहे.
AIMIM Imtiaz Jaleel Press Conference
AIMIM Imtiaz Jaleel Press ConferenceSarkarnama
Published on
Updated on

AIMIM Mumbai President News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष बैठका, मेळावे, रॅली इत्यादींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.

तर दुसरीकडे पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका, नियुक्त आणि बदल्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाने घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सोमवारी राडा झाल्याचे दिसून आले.

मुंबईत झालेल्या या पत्रकारपरिषदेत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) यांच्या समक्षच पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आपसात भिडल्याचे दिसून आले. एमआयएमने मुंबई अध्यक्ष फय्याज अहमदत यांना पदावरून हटवल्यामुळे, त्यांचे समर्थक चिडले आणि त्यामुळे पत्रकारपरिषदेत गोंधळ घातला गेला.

AIMIM Imtiaz Jaleel Press Conference
Imtiaz Jalil VS Nitesh Rane : ...तर नितेश राणेंना पोलिसांनी फटकावलं असतं; इम्तियाज जलील असं का म्हणाले?

एमआयएम(AIMIM ) पक्षाने फय्याज अहमद यांच्या जागी रईस लश्करिया यांना आता मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. फय्याज अहमद यांना पदावरून हटवण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एमआयएमच्या पत्रकारपरिषदेतच गोंधळ घातला.

AIMIM Imtiaz Jaleel Press Conference
Maharashtra Politics : तिसरी आघाडी सुसाट! राजू शेट्टीनंतर बच्चू कडू अन् इम्तियाज जलील वाढवणार महायुती, आघाडीचं टेन्शन

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या समक्ष पक्षविरोधी घोषणाबाजी केली गेली. यावेळी पक्षाच्या माजी मुंबई अध्यक्षांनी एमआयएमला भाजप(BJP) आणि एकनाथ शिंदेची बी टीम म्हटलं आहे. जलील यांच्या समोरच फय्याज अहमद यांच्या समर्थकांनी जोरदार शिवीगाळ केल्याचे दिसून आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com