Rane vs Thackeray : दिशा सॅलियन खून प्रकरणात आदित्य ठाकरे.....राणेंचा गंभीर आरोप

Narayan Rane : या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मॉडेल दिशा सॅलियन (Model Disha Salian) खून प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा संबंध असल्याचे बोलले जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज केले.आता ठाकरेंचे सरकार नाही. आमचे सरकार आहे. त्यामुळे आता चौकशी होणारच असा इशाराही राणे यांनी दिला.

Narayan Rane
उद्धवजी, ‘ते’ शब्द परत घ्या : देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन

या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे. या प्रकरणाची सर्वजण चर्चा करीत आहेत. खासगीत अनेकजण बोलत असून आता या प्रकरणाची चौकशी केल्यास सर्वकाही बाहेर येईल, असे राणे यांनी सांगितले. मॉडेल दिशा सॅलियान प्रकरणात राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्याकडून गेल्या एक-दीड वर्षभरापासून अप्रत्यक्षपणे वारंवार आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात येत होते. मात्र, आज प्रथमच राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीरपणे घेतले आहे.

Narayan Rane
PUNE POLICE : अबतक 100 ; अमिताभ गुप्तांनी 'मोक्का' कारवाईचे ठोकले शतक

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मला मारण्यासाठी छोटा शकील व राजन टोळीला उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिल्याचा आणखी एक गंभीर आरोप राणे यांनी केला.याला मारायला लाव. त्याचे घर जाळ या पलिकडे उद्धव ठाकरे यांनी काहीही केलेले नाही. हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय असा प्रश्‍न राणे यांनी केली.

Narayan Rane
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा

शिवाजी पार्कवर झालेली सभा म्हणजे केवळ शिमगा आणि तमासगिरांचा मेळावा होता, अशी टीका राणे यांनी केली. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, दीड वर्षाच्या मुलाबद्दल बोलताना ठाकरे यांना लाज वाटायला हवी, या शब्दात राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. इतक्या लहान मुलाला राजकारणात ओढणाऱ्या ठाकरे यांची पात्रता लक्षात येते, असे ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. ज्यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अडीच तासदेखील काम केले नाही, त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका करणे शोभत नाही, अशी टीका राणे यांनी केली. या पुढच्या काळात अशी टीका आम्ही सहन करणार नाही. ते असेच बोलत राहिले तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा राणे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com