काँग्रेसचं येरं माझ्या मागल्या; देशभरात पराभव अन् महाराष्ट्रातही ओढवली ही नामुष्की

काँग्रेसचे (congress) महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केली नाराजी व्यक्त
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबमध्ये तर काँग्रेसचा (Congress) आम आदमी पक्षाने (AAP) सुपडा साफ केला. या पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसने काही धडा घेतला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K. Patil) यांनीच या नोंदणीबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी एच. के. पाटील यांनी हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचे? असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे.

Nana Patole
सुप्रिया सुळे म्हणतात, दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे महागाईही वाढणार नाही

महाराष्ट्र काँग्रेसला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले होते. मात्र, महिन्याचा शेवटच्या आठवडा सुरु असताना ही अद्याप 10 लाख सदस्य नोंदणीचा टप्पाही काँग्रेसला गाठता आलेला नाही. यावरुन एच. के. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा आणि कर्नाटकची कामगिरी चांगली झाली आहे. मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह चांगला नसल्याची खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Nana Patole
पाटणकर प्रकरणातील चतुर्वेदीनं ईडीला दमवलं; अनेकदा समन्स पाठवलं, यूपीतही शोधलं पण...

काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला जानेवारी 2022 मध्ये सुरुवात झाली होती. त्या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार असल्याचे म्हटले होते. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नाही. हे अभियान अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह आहे. अभियान यशस्वी करण्यात महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, असा दावा पटोले यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com