पाटणकर प्रकरणातील चतुर्वेदीनं ईडीला दमवलं; अनेकदा समन्स पाठवलं, यूपीतही शोधलं पण...

श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर मंगळवारी ईडीने कारवाई केली. या कारवाईत हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांचंही नाव पुढे आलं आहे.
ED Action
ED ActionSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर मंगळवारी ईडीने (ED) कारवाई केली. या कारवाईत हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedi) याचंही नाव पुढे आलं आहे. ही कारवाई होण्याच्या आधीपासूनच ईडी त्याच्या मागावर आहे. पण अद्याप तो ईडीच्या हाती लागलेला नाही.

ठाण्यात नीलांबरी हा गृहनिर्माण प्रकल्प पुष्पक बुलियन या कंपनीने उभारला आहे. पुष्पक बुलियन कंपनीच्या विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदकिशोर चतुर्वेदीनेच अनेक शेल कंपन्यांच्या मार्फत पैसे वळवल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे. या कंपनीची 22 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कंपन्यातील काही फंड हे वेगवेगळ्या फर्ममध्ये वळवण्यात आला आहे. ईडीचे अधिकारी यातील डीलर नंदकिशोर चतुर्वेदीपर्यंत पोहोचली.

ED Action
केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसुली; शेलारांच्या मागणीवर वळसे पाटलांची चौकशीची घोषणा

श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधारही नंदकिशोर चतुर्वेदीच असल्याचं समजतं. मात्र, तो ईडीला अद्याप सापडलेला नाही. त्याला अनेकदा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पण तो एकदाही हजर झालेला नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील मथूरेत जाऊन त्याचा शोध घेतला. पण तिथेही तो सापडला नाही. अजूनही ईडीचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानं देशातून पळ काढला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya)हे आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. ईडीने काल जो व्यवहार समोर आणला आहे त्यानुसार ३० कोटी रुपयांचं मनी लॉन्डरिंग झालं आहे. सगळी प्रकरणे बाहेर आली तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे. नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणेंचा गंभीर आरोप

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. ''नंदकुमार चतुर्वेदी यांचा मनसुख हिरेन तर केला नाही ना,'' असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी बाबत मी गेल्यावर्षी पासून बोलत आहे. ते कुठे आहे हे समोर आले पाहिजे, मी गेल्यावर्षी पासून ट्विट करीत आहे. या नंदकिशोर यांच्या माध्यमातून हवाला झाला आहे, ते कुणाचे पार्टनर आहे,' असं राणे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com