Maharashtra Cabinet : सततचा पाऊस यापुढे नैसर्गिक आपत्ती; मंत्रिमंडळ बैठकीत कोणते मोठे निर्णय?

Maharashtra Cabinet Decision : मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय..
Maharashtra Cabinet : Eknath Shinde : Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet : Eknath Shinde : Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinet Decision : “सततचा पाऊस” ही बाब आता यापुढे नैसर्गिक आपत्ती म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सततच्या पावसामुळे शेतीचं नुकसान होण्यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा होणार आहे.

अतिवृष्टी ही राज्य शासनाच्या ही राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली नैसर्गिक आपत्ती असणार आहे. महसूल मंडळात उपलब्ध केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये जर २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर, या मंडळातील सर्व गावांत शेती आणि शेतपीकांच्या नुकसानबाबत पंचनामे करण्यात येते. शेतीतल्या पीकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास, जेवढं नुकसान झालं आहे, तेवढ्या भागाकरिता ठरलेल्या दराने अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना साहाय्य करण्यात येते.

मात्र महसूली मंडळात अतिवृष्टीची किंवा सततच्या पावसाची नोंद झालेली नसतानाही संबंधित मंडळातील परिसरात अतिवृष्टी होऊ ही शकते आणि यामुळे शेतीचे नुकसानीचे संकट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानीचं मदत मिळणे गरजेचे असते. त्यामुळे सतत पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet : Eknath Shinde : Devendra Fadnavis
Nitin Gadkari Statement : ''राहुल गांधी यांचे आभार मानतो;कारण...''; मंत्री गडकरींचं सावरकर वादावर मोठं विधान

राज्य शासनाकडून घोषित करण्यात आले की, “अतिवृष्टी” या नैसर्गिक आपत्तीत, २४ तासांच्या अवधीमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस हाच निकष कायम ठेवण्यात आला आहे. यासोबतच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात आलेल्या दुसऱ्या ट्रीगरमध्ये “सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)” हा अधिकचा निकष शेतीपिक नुकसानीकरिता ग्राह्य धरणार येणार आहे. दुष्काळाशिवायही इतर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती कोसळ्यामुळे शेतीच्या नुकसानीसाठी हा निकष ग्राह्य ठेवण्यता येणार आहे.

Maharashtra Cabinet : Eknath Shinde : Devendra Fadnavis
Ramtek Lok Sabha : तुमानेंची वाट खडतर; आघाडीची ताकद अन् मतदारसंघाचा इतिहासही ठाकरेंच्या पथ्यावर पडणार...?

मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय :

1) शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित

2) ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद

3) नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार

4) देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल

5) सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण

6) महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.

7) अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

8) नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ‘परिस स्पर्श’ योजना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com