Congress Nyay Yatra : न्याययात्रेचा समारोप अन् इंडिया आघाडी फुंकणार लोकसभेचं रणशिंग; असा आहे 'इंडिया'चा प्लॅन

INDIA Alliance : मुंबईतील राहुल गांधींच्या नेतृत्वातील रॅलीला इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची हजेरी
Congress Nyay Yatra
Congress Nyay YatraSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे रॅलीने होणार आहे. या रॅलीला राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. या रॅलिच्या निमित्त शक्तिप्रदर्शन करून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस न्याय यात्रेच्या समारोपास इंडिया आघाडीतील सर्व नेते येणार आहेत. यात अखिलेश यादव, तेजस्वी यादव, एमके स्टॅलिन, फारुक अब्दुल्ला, चंपई सोरेन, कल्पना सोरेन, सौरभ भारद्वाज (आप), दिपांकर भट्टाचार्य, शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह इंडिया १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress Nyay Yatra
Sanjaykaka Patil : भाजपमधूनच संजयकाका पाटलांना विरोध; विलास जगतापांचे गंभीर आरोप, म्हणाले...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर रॅलीने होणार आहे. यावेळी होणाऱ्या सभेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी रणसिंग फुंकणार आहे. दरम्यान, शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या रॅलीचा खर्च निवडणूक खर्चात दाखवला जाणार असल्याचे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा शनिवारी दुपारी मुंबईत पोहोचणार आहे. सध्या यात्रा पालघर जिल्ह्यात आहे. पालघरमधून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, सरकारने सुरू केलेल्या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून खासगी विमा कंपन्यांना होत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान होत असताना, सरकार विमा कंपन्यांना मोठा हप्ता भरूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास देशव्यापी जात जनगणना केली जाईल, असेही आश्वासन राहुल गांधींनी दिले.

(Edited by Sunil Dhumal)

Congress Nyay Yatra
Cabinet Meeting: आचारसंहितेपूर्वीच महायुती सरकारचा निर्णयांंचा धडाका; एकाच आठवड्यात विक्रमी तिसरी बैठक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com