इंदौर : काही दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. इंदौर येथे नुकतेच त्याने आगामी चित्रपटाचे शुटिंग केले. पण त्यावरून आता नव्या वर्षात (New Year) तो अडचणीत आला आहे. बेकायदेशीरपणे नंबर प्लेट वापरल्याप्रकरणी विकीविरोधात पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विकी कौशल व कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 9 डिसेंबर रोजी विवाह झाला आहे. त्यानंतर विकी कौशल आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी इंदौरमध्ये (Indore) आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान (Sara ali Khan) आहे. शुटिंगदरम्यान दोघांनी एकाच दुचाकीवरून इंदौर शहरात फिरताना दिसते. पण या दुचाकीला असलेला नंबर आपल्या वाहनाचा अहल्याचा दावा येथील एका व्यक्तीने केला आहे.
जय सिंग यादव असे या व्यक्तीचे नाव असून त्याने विकी कौशल विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. आपली परवानगी न घेता वाहनाचा नंबर बेकायदेशीरपणे वापल्याचा त्यांचा आरोप आहे. ते म्हणाले, चित्रपटात वाहनाला वापरण्यात आलेला नंबर माझा आहे. याबाबत चित्रपट निर्मात्यांना माहिती आहे किंवा नाही, याची माहिती नाही. पण हे बेकायदेशीर आहे. त्यासाठी माझी परवानगी घेतललेी नाही. याबाबत मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
इंदौर बनगंगा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनी म्हणाले, आमच्याकडे तक्रार आली आहे. नंबर प्लेटचा बेकायदेशीपणे वापर केला आहे किंवा नाही, याचा तपास केला जाईल. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली आहे. इंदौरमध्येच चित्रपटाचे युनिट असेल तर चौकशी केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, विकी कौशल आणि सारा अली खान यांची इंदौरमधील अनेक छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. विकीनेही इन्स्टाग्रामवर दोघांचे दुचाकीवरील छायाचित्र पोस्ट केलं आहे. लग्नानंतर विकी कौशलचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे त्याबाबत त्याच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. पण याच चित्रपटाच्या शुटिंगमुळे तो अडचणीत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.