Iqbal Chahal : ईडीच्या समन्सवर मुंबई पालिका आयुक्त चहल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Iqbal Chahal : मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये ईडीची धास्ती होती.
Iqbal Chahal :
Iqbal Chahal : Sarkarnama

Iqbal Chahal : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या समन्सवर मुंबई महापालिकेचे आयुकित व सद्याचे पालिका प्रशासक आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याला अशा प्रकारचे कोणतेही समन्स अजूनपर्यंत मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. नुकतीच चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती मिळाली होती, परंतु आता स्वत:चहल या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Iqbal Chahal :
ST Workers : 'एसटी'साठी ३०० कोटी मंजूर : कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होणार का?

मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात येणार आहे, याबाबत जोरदार चर्चा केली जात होती. यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये धास्ती होती. चहल यांना समन्स बजावण्यात आल्याचीही नुकतीच बातमी माध्यमात आली होती. मात्र आता चहल यांनी कोणतेही नोटीस न आल्याचे सांगितले आहे

मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कामांना वगळून इतर कामांची चौकशी करा, असे आदेश नुकतेच राज्य सरकारने कॕगला दिले होते. रस्ते तसेच इतर कामांची चौकशी करण्यासाठीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ईडीच्या समन्सच्या मुद्द्याने डोक वर काढले.

Iqbal Chahal :
Pimpri Chinchwad News : "आक्रीतच घडले, ज्यांच्याविरूद्ध तक्रार मंत्र्यांनी त्यांच्याकडेच सोपवला तपास!"

दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एपिडेमिक एक्टनुसारच सर्व कामे केल्याचा दावा करत त्याबाबतीत तपशील देण्याच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली होती. तसेच यंत्रणेतील अधिकार्‍यांना कॕगच्या अधिकारी वर्गाला कोविड काळातील कामांची माहिती देण्यासाठी मज्जाव केला होता. त्यामुळे कॕगच्या अधिकारी वर्गानेही या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु राज्य सरकारने कोरोना काळातील कामे वगळून चौकशीचे आदेश देण्याची भूमिका काही दिवसांपूर्वी घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com