कंबोज यांना इक्बालसिंग चहल यांनी सुनावले; आम्हाला त्यात ओढू नका...

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर राजकारण तापले आहे.
Mohit Kamboj, Iqbal Singh Chahal
Mohit Kamboj, Iqbal Singh Chahalsarkarnama

मुंबई : शिवसेना (shivsena) नेते व मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या बेहिशेबी मालमत्तांच्या प्रकरणात पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यावरही भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आरोप केले होते. हे सर्व आरोप फेटाळून लावत चहल यांनी कंबोज यांना इशारा दिला आहे.

चहल म्हणाले, तुमची राजकीय लढाई तुम्हा राजकारणाच्या पातळीवर लढा, त्यामध्ये अधिकाऱ्यांना ओढू नका, असा इशारा त्यांनी दिला. यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर विभागाने छापे मारून ७२ तास शोधमोहीम राबवली होती. या चौकशीत जाधव यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Mohit Kamboj, Iqbal Singh Chahal
IT Raid: यशवंत जाधवांनी दिले 'मातोश्री'ला दिले दोन कोटी अन् ५० लाखांचे घड्याळ

पालिकेतील विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीकडे येण्यापूर्वी त्याला आयुक्तांची मंजुरी लागते. त्यामुळे या भ्रष्टाचारात आयुक्तांचाही समावेश असल्याचा आरोप कंबोज यांनी सोशल मीडियावरुन केला होता. आयुक्तांनी भ्रष्टाचार करून परदेशात अमेरिकेत मालमत्ता गोळा केली असल्याचेही कंबोज म्हणाले होते. तसेच काळ्या यादीतील कंत्राटदारांना कोरोनाकाळात कामे दिल्याचे आरोपही कंबोज यांनी केले होते. आयुक्तांची अमेरिकेत कोट्यवधींची संपत्ती असल्याचा दावा करत येत्या आठवड्याभरात प्राप्तीकर विभागाकडे माहिती देणार असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले होते. यशवंत जाधव यांच्याशीही चहल यांचे साटेलोटे असल्याचा खळबळजनक आरोप कंबोज यांनी केला होता.

Mohit Kamboj, Iqbal Singh Chahal
गोव्यात भाजपची कोंडी! काँग्रेसने शपथविधीच्या आधी टाकला डाव

हे सर्व आरोप आयुक्तांनी फेटाळून लावले. तसेच हे सर्व आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले. निष्कारण आपल्याला वादात ओढले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत आपली कोणतीही मालमत्ता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com