Ajit Pawar Comments on Devendra Fadanvis: परकीय गुंतवणुकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढाच; खरंच काय झालंय ते कळेल, अजित पवारांची भूमिका

Mumbai Politics: परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकवर आल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता
Ajit Pawar | Devendra Fadanvis:
Ajit Pawar | Devendra Fadanvis:Sarkarnama

Ajit Pawar Comments on Devndra Fadanvis: परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकवर आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पण याची श्वेतपत्रिका काढा, किंवा त्या परकीय गुंतवणुकीचे गेल्या १० वर्षातील रेकॉर्ड तरी काढा, काढा., त्यात तथ्य असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करु, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.

परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकवर आला आहे. परदेशी गुंतवणूक सर्वात जास्त महाराष्ट्रात आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. अशी माहिती नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका कार्यक्रमात दिली. उद्योग राज्याबाहेर गेले असे विरोधक म्हणत होते. त्यांना या अहवालातील आकडेवारीने चोख उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी आतातरी आपली तोंडे बंद करावीत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Ajit Pawar | Devendra Fadanvis:
Devendra Fadnavis : गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; फडणवीस म्हणाले, "विरोधकांनी आता तरी..."

फडणवीसांच्या या दाव्याला अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. ''देवेंद्र फडणवीस म्हणाले की परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर एक'ला आलाय. पण हा संशोधाचा विषय आहे गेल्या अकरा महिन्यात अनेक उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले. विधानभवनातही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही याबद्दल आवाज उठवला होता. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपण श्वेतपत्रिका काढणार असल्याचं म्हटलं होते. अजून काही त्यांची श्वेतपत्रिका निघालेली नाही. ''

Ajit Pawar | Devendra Fadanvis:
Sunil Dutta Birthday : अभिनेते सुनील दत्त यांनी 'या' मित्राच्या सांगण्यावरुन घेतला राजकारणात प्रवेश

''राज्यात येणारे मोठमोठे उद्योग दीड-दीड लाख लोकांना रोजगार देणारे उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले. याचा फटका राज्यातील तरुण-तरुणींना बसला आहे. राज्यात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. हेही एक कारण आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की श्वेतपत्रिका काढतो. ती श्वेतपत्रिका तरी काढा, किंवा तुम्ही म्हणताय परकी गुंतवणूक वाढली, तर त्याचं १० वर्षातील रेकॉर्ड तरी काढा. त्यात तथ्य असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करु. '' असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

''अभिनंदन करताना आम्ही म्हणू की अडीच वर्ष आम्ही होतो, परकीय गुंतवणूक येण्यासाठी आम्ही पोषक वातावरण तयार केलं म्हणून ही गुंतवणूक आली, म्हणून तो पहिला नंबर आला, असही आम्हाला म्हणण्याचा अधिकार आहे,'' अशी मिश्लिक टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com