Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक निश्चित झाल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांकडून मिळाली आहे. १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान हा युक्तिवाद होणार असून, २३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांमध्ये अंतिम सुनावणी पार पडणार आहे. तर याबाबतचा अंतिम निकाल थेट डिसेंबरच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. यावर आता कायदेतज्ज्ञ असिम सरोदे (Asim Sarode) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
असिम सरोदे म्हणाले, "या प्रकरणी साक्षी-पुरावे घेण्याची प्रक्रिया राबविण्याची गरज नाही व साक्षी-पुरावे घेण्याचा प्रकार बेकायदेशीरतेकडे नेणारा ठरू शकतो. ज्या गोष्टी आधीच सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच मान्य केल्या आहेत. ज्या आधारे सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेच्या प्रकरणी संपूर्ण निर्णय देण्यात आलेला आहे, त्यावर अशाप्रकारे प्रक्रियावादी सुनावणी घेणे म्हणजे कायद्याच्या आडून विलंब लावणे आहे."
"वेळकाढूपणाला कायद्याच्या चौकटीत घुसवणे हा वाईट पायंडा विधानसभा न्यायाधिकरण ( State Assembly Tribunal) च्या कामकाजात निर्माण होणे कायद्याच्या योग्य प्रक्रियेला आव्हान देणारे ठरेल. 6 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2023 हे कामकाज करायचेच असेल तर ते केवळ 2 दिवसांच्या तारखांमध्ये होणारे आहे. 27 ऑक्टोबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 हे कामकाजसुद्धा जास्तीत जास्त 4 दिवसांत होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात हे टाइमटेबल दाखल होईल तेव्हा सर्वोच्च न्यायालयातसुद्धा इतके दिवस लावण्याच्या प्रवृत्तीवर नाराजी व्यक्त होईल असे वाटते," असे सरोदे म्हणाले.
"घोडामैदान दूर नाही व कुणी घोडेबाजार करू नये, यासाठी कायद्याची वेसण कधी लागणार? असा प्रश्न लोक आता आम्हाला वकिलांना विचारतात व उत्तर देणे आमच्या हाती नाही. कारण सध्या कायद्याच्या तर्कांवर आधारित कामकाज होईलच, असे कुणी आश्वस्त करू शकण्याच्या शक्यता अंधुक आहेत, अशी खंतही सरोदेंनी व्यक्त केली.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.