Bharat Jodo Yatra Jairam Ramesh : भारत जोडो यात्रा आज शेगाव येथे पोहचली आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मनसे,भाजप, ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. (Bharat Jodo Yatra Jairam Ramesh news)
या सर्व वादात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते.
जयराम रमेश म्हणाले, "भारत जोडो यात्रा ही वर्तमान, भविष्यातील मुद्यांसाठी आहे. यात सावरकरांचा मुद्या काढू नका. देशाच्या इतिहासाबाबत आपण नंतर बोलू. भारत जोडो यात्रेत आर्थिक विषमता, हुकुमशाहीला विरोध, राज्य घटना वाचविण्यासाठी प्रयत्न यासाठी जनतेशी संवाद साधण्यात येत आहेत, " "आता 'सावरकर छोडो-भारत जोडो," असे म्हणत जयराम रमेश यांनी या विषयावर बोलण्याचे टाळाटाळ केली.
"राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा कोणीही रोखू शकत नाही. ज्यांना काळे झेंडे दाखवायचे आहे त्यांनी ते दाखवावे, इतिहासाबाबत आज चर्चा करु नका," असे जयराम रमेश म्हणाले.
राहुल गांधी यांना बॅाम्बने उडवून देण्याची धमकी एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत चिंता आहे. कारण त्यांची आजी,वडील यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. राहुल यांच्या सुरक्षेची जबाबदारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह प्रशासनाचीही आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करणार नाही," असे जयराम रमेश म्हणाले.
जयराम रमेश म्हणाले, "भारत जोडो यात्रेत एकता, एकजुटता दिसत आहे. त्याचा निवडणुकीत काय परिणाम काय होईल, हा वेगळा मुद्या आहे. सेवादलाचे कार्यकर्ते या यात्रेचा घरोघरी प्रचार करीत आहेत. २०२४ निवडणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लढवली जाईल. ही निवडणूक स्मार्ट फोनची निवडणूक असेल,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.