मिटकरींचे 'ते' मत वैयक्तिक : दिलगिरी व्यक्त करत पाटील-मुंडेंनी संपवला विषय

Amol Mitkari | Jayant Patil | Dhananjay Munde : अमोल मिटकरींची मंत्रोच्चारणा वादात
Jayant Patil | Dhananjay Munde
Jayant Patil | Dhananjay Munde Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) वादात सापडले आहेत. त्यांनी पक्षाच्या एका जाहीर सभेत लग्नाच्या विधी दरम्यानची मंत्रोच्चारणा केली होती. मात्र या मंत्रोच्चारणामधून त्यांनी ब्राम्हण (Bramhan) समाजाची हेटाळणी केल्याचा आरोप करत ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला असून आज महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन केले. तसेच ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोपही त्यांच्यातर्फे करण्यात आला.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (NCP) ब्राम्हण महासंघाच्या आंदोलकांना विरोध करत मिटकरींची भाषा आणि भाषाशैली योग्यच असल्याचा दावा केला आहे. जर त्यांनी अश्लील घोषणा दिलेल्या असतील तर त्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. तसेच अमोल मिटकरींच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, हे भाषण म्हणजे हा त्यावेळचा एक विनोद होता. मात्र महाराष्ट्रात आज काल विनोद बुद्धी राहिलेली नाही. राजकीय रंग देऊन, इश्यू करून त्याचे फायदे घ्यायचे धंदे सुरू आहेतअसे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले.

या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी होतं होती. पण त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. मिटकरी यांचे ते विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण ते माझ्या व्यासपीठावर घडल्यामुळे त्या विधानबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

अमोल मिटकरी यांनी लग्न लावतानाची जी प्रक्रिया असते त्या बद्दलचा मंत्रोच्चार केला होता. त्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केले, त्यावर मी तात्काळ माईकवर टॅप करुन त्यांना भाषण थांबवण्यास सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी जे विधान केले ते त्यांचे वैयक्तिक विधान आणि मत आहे. ब्राम्हण समाजाने आम्हाला कायमचं सहकार्य आणि स्वागत केले आहे. त्यामुळे ब्राम्हण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू त्या सभेचा नव्हता. मात्र त्यानंतरही मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ती आमची भूमिका नव्हती. तसेच, माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झालं, असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडेंकडूनही दिलगिरी

आमदार अमोल मिटकरी यांनी 'कन्यादान विधी',वैदिक मंत्र , समाज याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे, मात्र जात-पा -धर्म यात भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही. परंतु माध्यमांमधून अमोल मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून दोष दिला जातो हे चुकीचे आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून मिटकरी बोलत नव्हते तर एका लग्नसमारंभातील प्रसंग त्यांनी आपल्या भाषणात सांगितला. तरीही यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलताना अमोल मिटकरी यांनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादानाचा विधी सुरु होता. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. पण कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. बर असतो तर असतो.

आता नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज मंत्र म्हणत होते, यात तुमचा आणि तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या आणि माझ्या मागे म्हणा, मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं, आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com