चव्हाणांच्या गौप्यस्फोटाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे
Jayant Patil, Ashok Chavan
Jayant Patil, Ashok Chavansarkarnama

मुंबई : शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भेट घेऊन शिवसेना-काँग्रेस आघाडीबाबत चर्चा केली, असा गौप्यस्फोट काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला होता. असेल तर त्यात तथ्य आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

Jayant Patil, Ashok Chavan
चव्हाणांनी, शिंदेंवर सोडलेल्या बाणाचा भेद करण्यासाठी भाजप नेते मैदानात

सध्या शिंदे यांनी जी युती केली आहे, ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी गॅस दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली.

सुरुवातीला मोदी सरकारकडून सर्वांना गॅस सिलिंडर वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सिलिंडर घेतल्यावर अंशदान कमी करण्यात आले. म्हणजे मोदी सरकार गॅसचा व्यवसाय करतेय असे वाटू लागले आहे, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil, Ashok Chavan
रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांची घरी जाऊन घेतली कुटुंबीयांची भेट!

आता सिलिंडर वापरावर बंधन आणणे म्हणजे खुल्या बाजारात जो दर असेल (उदा. दोन-अडीच हजार रुपये ) त्याच दरात जनतेला गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. मात्र या सरकारच्या धोरणामुळे जनतेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com