रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांची घरी जाऊन घेतली कुटुंबीयांची भेट!

Sanjay Raut : रश्मी ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन टेंभी नाका येथील देवीचं दर्शन घेतलं.
Sanjay Raut & Rashmi Thackeray Latest News
Sanjay Raut & Rashmi Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ते सध्या ऑर्थर जेलमध्ये आहेत.

दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे. (Sanjay Raut & Rashmi Thackeray Latest News)

Sanjay Raut & Rashmi Thackeray Latest News
मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री अन् जमली हजारोंची गर्दी

दरम्यान, आज रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात जाऊन टेंभी नाका येथील देवीचं दर्शन घेतलं आहे. यानंतर त्यांनी सध्या जेलमध्ये असलेले संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. आज ठाण्यात देवीची महाआरती केल्यानंतर राऊतांच्या घरी भेट देवून त्यांनी योग्य टाय़मिंग साधल्याची चर्चा होत आहे. या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राऊतांच्या अटकेनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

Sanjay Raut & Rashmi Thackeray Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जुलैला रोजी राऊतांना अटक केली आहे. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. १ हजार कोटींच्या गैरव्यवहारात राऊतांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. मात्र आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला १९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत दिले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत राऊत यांची न्यायालयीन कोठडी १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Sanjay Raut & Rashmi Thackeray Latest News
भाजप नेत्याच्या ट्विटमुळे दसरा मेळाव्याआधीच शिंदे गट अडचणीत...

दरम्यान, मुंबई, गोरेगावात पार पडलेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळाव्यात संजय राऊत यांची रिकामी खुर्ची स्टेजवर ठेवण्यात आली होती. राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली. कारण ते मिंधे गटात गेले नाहीत. तर ते लढत आहेत. ते हे लढवय्या आहेत. त्यामुळे त्यांची खुर्ची आज या ठिकाणी ठेवल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com