NCP Sharad Pawar : 'होय... जयंत पाटीलच सेनापती!' ; मुंबईतून थेट रोहित पवारांनाच पत्र

Jayant Patil Vs Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सेनापती कोण यावरुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात विजयोत्सवाच्या स्टेजवरच कलगीतुरा रंगला.
Jayant Patil, Rohit Pawar
Jayant Patil, Rohit PawarSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 पैकी 8 जागा जिंकल्या. या मागे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची रणनीती असल्याचा दावा केला जात आहे. यावरून विजयोत्सवाच्या स्टेजवरच आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला. यानंतर मुंबईतही ठिकठिकाणी जयंत पाटलीच सेनापती असल्याचे फलक रोहित पवारांना उद्देशून लावण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीत सर्वात कमी 10 जागा घेऊन त्यातील 8 जागा निवडून आणण्याची किमया शरद पवारांनी Sharad Pawar केली. त्यासाठी जयंत पाटलांनी रणनीती आखल्याने त्यांचे सेनापती म्हणून पुण्यात फोटो झळकले. त्यानंतर रोहित पवारांनी, हा कुणा एका सनेपतीचा विजय नाही, तर राज्यातील कार्यकर्त्यांचा असल्याचे असे बोलून दाखवले. त्यानतंर जयंत पाटलांनीही मी नोव्हेंबरमध्ये जाणारच आहे. तोपर्यंत जाहीर विधाने करणे टाळावीत, असा टोला लगावला. यानंतर मात्र मुंबईतही जयंत पाटलांच्या समर्थनार्थ फलक लागले आहेत.

Banner in Mumbai
Banner in MumbaiSarkarnama

हे फलक दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्ष संतोष पवारांनी लावले असून ते रोहित पवारांना Rohit Pawar उद्देशून आहेत. त्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी जयंत पाटलांना बुडत्या जाहजेचा कॅप्टन, ओसाड गावचे पाटील असे हिणवले होते. त्यांनी मात्र महाराष्ट्र पिंजून पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम केले. आता स्व‍कीय सोडून गेले असतानाही ईडी, सीबीआयला भीक न घालता ते शरद पवारांसोबत आहेत, याकडे रोहित पवारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Jayant Patil, Rohit Pawar
Rohit Pawar Vs Jayant Patil : 'सेनापती'वरुन वादाची ठिणगी? जयंत पाटील अन् रोहित पवार नेमके काय म्हणाले...

आता लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत वाट्याला आलेल्या 10 पैकी 8 जागा निवडून आणल्या आहेत. यासाठी त्यांनी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी गणित जुळवून आणली. पवार साहेबांच्या व्यूहरचना या प्रत्यक्षात फिल्डवर उतरवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच या बलाढ्य विजयाचे सेनापती हे पवारांचे निष्ठावंत जयंत पाटीलच Jayant Patil आहेत, असेही फलकातून ठासून सांगण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

Jayant Patil, Rohit Pawar
Manoj Jarange Patil News : उपोषणाचा चौथा दिवस, बीपी लो, शुगर घसरली; जरांगेंच्या प्रकृतीने प्रशासन हादरले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com