Jayant Patil News : ईडी चौकशीनंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, ''ईडीकडे आता कुठलेही...''

NCP Politics : ''...त्यावेळी मी पुन्हा ईडी कार्यालयात येईल!''
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज (दि.२२ ) ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली होती. प्रदीर्घ चौकशीनंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पाटील ईडी कार्यालयाबाहेर पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. पण यानंतर जयंत पाटील यानी सूचक वक्तव्य केलं आहे.

ईडी(ED)च्या चौकशीनंतर जयंत पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. त्यामुळे यानंतर ईडीकडे आता कुठलेही प्रश्न शिल्लक राहिले नसतील. तसेच ईडीच्या अधिकार्यांनी मला चांगली वागणूक मिळाली, त्यामुळे त्याविषयी कोणतीही तक्रार करण्याची आवश्यकता नाही.

Jayant Patil
Anil Deshmukh News: अनिल देशमुख आता पुस्तकातून उलगडणार सत्य; कोणते गौप्यस्फोट करणार?

पू्र्ण आय़ुष्यात आयएलएफएसशी कुठलाही संबंध आला नाही. ईडीकडून पूर्ण दिवस लेखी जबाब घेतले जातात. म्हणून या चौकशीला वेळ लागतो. तसेच ईडीला तपासादरम्यान मी पूर्ण चौकशीला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. ते मला ज्यावेळी चौकशीसाठी बोलावतील, त्यावेळी मी पुन्हा ईडी कार्यालयात येईल असंही अधिकाऱ्यांना सांगितल्याचं पाटील म्हणाले.

पक्षातील नेतेमंडळींना इतरही कामं असतात. आणि सगळ्यांना जयंत पाटील स्वच्छ प्रतिमा असल्याची माहिती आहे. तसेच पक्षातील सर्वच नेतेमंडळींना माझ्यावर विश्वास आहे. म्हणूनच ते इथे आले नाहीत असंही पाटील म्हणाले.

कर्नाटक निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील लोकं जागरुक, हुशार, सूज्ञ आहेत. आणि यावर मी अगोदरच सर्वकाही बोललो आहे. त्यामुळे त्यावर जास्त काही भाष्य करण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

Jayant Patil
Pimpri-Chinchwad Crime News: दहा दिवसांत गोळीबार करून दुसरा खून; पिंपरी-चिंचवड हादरलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL & FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे. ईडीचे तीन अधिकारी जयंत पाटलांची चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या चौकशीविरोधात मुंबईसह विविध ठिकाणी निदर्शने केली. राष्ट्रवादी(Ncp)च्या मुंबई कार्यालयाबाहेर जयंत पाटलांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली.सांगलीहून काही कार्यकर्ते मुंबईत आले असून काही कार्यकर्ते सांगली येथेच ईडी आणि भाजपाविरोधात राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com