Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

Maharashtra Politics : पाच वर्षे शरद पवाराचं डोकं कुणी खाल्लं?
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) दोनदिवसीय शिबिराचा समारोप आज (शुक्रवारी) झाला. अजित पवारांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिले.

काकांच्या पाठीत सुरा कुणी खुपसला? असा सवाल आव्हाडांनी केला. 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही, बाप व्हायला अक्कल लागते," अशा शब्दांत आव्हाडांनी अजितदादांना फटकारलं.

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले. त्याची आठवण आव्हाडांनी करून दिली. "तुम्ही बंड केले, पण काकांनी तु्म्हाला पुन्हा घरात घेतले. दादांना चुलत बहीण नकोशी झाली होती. पाच वर्षे पवाराचं डोकं कुणी खाल्लं? असा सवाल करीत अजितदादांचं नाव न घेता त्यांच्यावर आव्हाडांनी टीकास्त्र डागले.

"पवारसाहेबांनी राजीनामा द्यावा ही अजितदादांची इच्छा होती," असा गौप्यस्फोट आव्हाडांनी केला. 'पवारांकडे भाजपमध्ये जाण्याचा अट्टाहास यांचाच होता,' असे ते म्हणाले. "शरद पवारांना संपविण्याची सुपारी त्यांनी घेतली होती," असा आरोप आव्हाडांनी केला.

Maharashtra Politics
Ajit Pawar Speech : कोर्ट-कचेरीच्या लढाईत अजिबात लक्ष घालायचं नाही; अजितदादांनी दमच भरला!

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या कर्जत येथील मंथन शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख टाळून वरिष्ठांनी सातत्याने आम्हाला गाफील ठेवले, अशी टीका शरद पवारांवर केली आहे. आमदार, खासदारांची कामे अडून पडत होती. त्यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय ‘देवगिरी’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सुप्रिया सुळे यांनाही याची माहिती देण्यात आली. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांचे मन वळवण्यासाठी सात-आठ दिवसांचा वेळ द्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. मात्र, जेव्हा सत्तेत सहभागी होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी (शरद पवार) माघार घेतली. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांनीच आंदोलन करायला लावले, असाही गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

Maharashtra Politics
Sanjay Raut : भाजपला Exit Poll मुळे फुटला घाम ! चारही राज्यांत काँग्रेसचे सरकार येणार; राऊतांचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com