Jitendra Awhad On Bhujbal : छगन भुजबळांची पक्षात गळचेपी; जितेंद्र आव्हाडांनी पेटवली वात

Ajit Pawar NCP : लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यानंतर राज्यसभेतही डावलले गेल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यानंतर राज्यसभेतही डावलले गेल्याने अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातून ते भाजप किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांची पक्षात गळचेपी होत असल्याचे सांगून अजित पवार गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड Jitendra Awahad म्हणाले, भुजबळांची पक्षात गळचेपी होत आहे, हे उघड आहे. पण आता ते काय निर्णय घेतील ते बघूया. ज्या सरकारमध्ये मनुस्मृती येते, त्या सरकारमध्ये ते का राहतील हा प्रश्नच आहे. माझे 2002 चे तिकीट छगन भुजबळ यांच्यामुळे फिक्स झाले होते. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे. आता मी इतका मोठा माणूस नाही की त्यांच्याशी बोलेन आणि परत बोलवेन, असेही आव्हाड म्हणाले.

लोकसभेत अमोल कीर्तिकर Amol Kirtikar पराभूत झालेले नाहीत, त्यांना पराभूत केल्याचा आरोपही आव्हाडांनी केला. ते म्हणाले, अधिकाऱ्याकडे असणारा फोन वायकरांच्या नातेवाईकांकडे कसा काय आला. अमोल आघाडीवर होता. निवडणूक अधिकारी सूर्यवंशी यांचे लागेबांधे कुठे-कुठे आहेत हे आम्हाला माहीत आहे, असेही ते म्हणाले.

Jitendra Awhad
Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar : 'मी अजितदादा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत! छगन भुजबळांनी बॉम्बच टाकला

देशभरात जो संशय होता की EVM मॅनेज होतात की नाही, पण आता सगळ्यांना कळालं की EVM मॅनेज होतात. फायनल मोजणी झाल्यावर पुन्हा बॅलेट कसे उघडले जाऊ शकते? मशीन असतानाही संख्येत चुका सापडतात. तर मग त्यात घोळ कसा काय होऊ शकतो, असे प्रश्न उपस्थित करत आव्हाडांनी कीर्तीकरांना पराभूत केल्याचा आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com