Jitendra Awhad, Chandrakant Patil

Jitendra Awhad, Chandrakant Patil

sarkarnama

आपला बाप आजारी असताना चर्चा करतो का ? आव्हाडांचा चंद्रकांतदादांना सवाल

कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का ? ती आपली संस्कृती नाही ना?''
Published on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात आज गैरहजर राहिल्याने विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रकृती बरी नसल्यामुळे कारभार सांभाळता येत नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावा, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, ''जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील. कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का ? ती आपली संस्कृती नाही ना?''

''कुणी वैयक्तिक टीका करीत असेल तर मी बोलणार नाही. शरद पवार यांनी लागू केलेले आरक्षण आता रद्द होण्याची वेळ आली आहे. केंद्राने सांगितले इन्मरिकल डाटा बरोबर आहे, पणनंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हा डेटा बरोबर नाही, असे म्हटले,''

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी विधानभवनात येणं बंधनकारक नाही. मंत्री नसताना तेव्हा राज्यमंत्री कारभार पाहतात. त्यामुळे त्यांना मंत्रालयात येणं बंधनकारक नाही. पंतप्रधान लोकसभेत येत नाही आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीवरून विरोधक प्रश्न विचार आहेत. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण मी कधी पाहिलं नाही''

<div class="paragraphs"><p>Jitendra Awhad,&nbsp;Chandrakant Patil</p></div>
आरोग्य परीक्षेचं काम न्यासालाच का? फडणवीसांच्या प्रश्नाला टोपेंनी दिलं उत्तर

चंद्रकांत पाटील म्हणाले, "'परंपरा आणि नियमानुसार कोणाला तरी चार्ज द्यावा लागतो. अन्य दोन पक्षांबद्दल त्यांचा अविश्वास स्वाभाविक आहे. कारण त्यांनी घेतला चार्ज तर ते सोडणारच नाहीत. पण त्यांच्या पार्टीमध्येही कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला पाहिजे. आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल तर रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा,"

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पेडणेकर चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या की,चंद्रकांत दादा हे भाजपाचे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. भाजपाचे नेते महिलांबाबत सातत्याने आक्षेपार्ह बोलत आहेत. ही हिंदू धर्माची शिकवण नाही. रश्मी ठाकरे कधीच राजकारणात पडत नाहीत. त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही,''

''रश्मी ठाकरेंबाबत काहीही बोलणे खपवून घेतले जाणार नाही. जर भाजपाचे नेते वारंवार असेच वक्तव्य करणार असेल तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का?'' असा टोला किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com