Lok Sabha Election: मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आव्हाडांनी सविस्तर सांगितलं

आघाडीतील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि लोकसभेच्या जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक निश्चित करण्यात आली होती. ही बैठक आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीत (MVA) जागा वाटपावरुन मतभेद असल्याचं उघडकीस आलं आहे. मविआतील नेत्यांशी चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी सांगितलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस (Congress) नाराज झाली. यानंतर काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगली मतदारसंघाबाबतची आपली बाजू हायकमांडसमोर मांडली. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि लोकसभेच्या जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक निश्चित करण्यात आली होती. ही बैठक आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली.

ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याबाबतची माहिती दिली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, आजच्या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्र प्रचार कसा करायचा, लोकांपर्यंत कसं पोहचायचं यावर चर्चा झाली. शिवाय आपलं कॅम्पेन पॉझिटीव्ह असावं यावर चर्चा झाली. यावेळी काही प्रेझेंटेशन झाल्याचंही आव्हाडांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आघाडीतील मतभेदांवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आव्हाड म्हणाले, आम्ही आज पुढच्या दीड-दोन महिन्यातील प्रचार आणि घोषणा कशी असावी याबाबत चर्चा केली. दरम्यान, आघाडी म्हटलं की मतभेद असतात, कोणीतरी नाराज हे होतंच पण शेवटी मन एकत्र करुन पुढं जायचं असतं. त्यामुळे आजच्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात प्रचार कसा असावा याबाबत आम्ही चर्चा केली. तसंच निवडणुकीत 'बस हुई महंगाई की मार, बस हुई मोदी सरकार' अशा घोषणा तयार करण्यावर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. अभिनेता गोविंदा शिंदे गटात गेल्याच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले, गोविंदा (Govinda) ज्यावेळी सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता. आता तो बाजूला केलेला माल आहे, त्यामुळे आता तो कुठेही जाऊद्या.

Jitendra Awhad
Shivsena Marathwada News : शिंदेच्या पहिल्या यादीतून छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आऊट..

आंबेडकर मोठे माणूस

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) बैठकीला न बोलावल्याचा आरोप केला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, आंबेडकरांचं मविआमध्ये स्वागत आहे. आम्ही अजून त्यांना बोलवतोय आपण एकत्र बसून चर्चा करुया, मार्ग काढुया असं आम्ही म्हणतोय. तसंच संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्यांना लोकांना फायदा होईल असं काम आपण केलं तर येणारी पिढी आपणाला माफ करणार नाही. आंबेडकर खूप मोठे माणूस आहेत. बैठकीला छोटे छोटे लोक असतात, त्यांची उंची खूप मोठी आहे. शिवाय बैठकीत काय घडलं हे सर्व त्यांना आम्ही फोनवरुन सांगत असतो. आमच्याकडे लपवण्यासारख काही नाही. राष्ट्रहितासाठी एकत्र यायला पाहिजे संविधान विरोधी लोकांविरोधात लढायला पाहिजे, असं आव्हाड म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

Jitendra Awhad
Rashmi Barve News : काँग्रेसला रामटेकमध्ये झटका! , रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com