Shivsena Marathwada News : शिंदेच्या पहिल्या यादीतून छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आऊट..

Political News : शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या जागा वाटपाचे गुऱ्हाळ मात्र सुरूच होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
Eknath Shinde and Hemant Patil
Eknath Shinde and Hemant PatilSarkarnama

Chhatrapti Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम महायुतीतील भाजपने राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर करत बाजी मारली. पण घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या जागा वाटपाचे गुऱ्हाळ मात्र सुरूच होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु या पहिल्या यादीतून मराठवाड्यातील हिंगोली वगळता छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिवमधील उमेदवार आऊट असल्याचे चित्र आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात मोठी साथ देणाऱ्या आणि संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीनगरला अजूनही वेटींगवरच ठेवण्यात आले आहे. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या 13 खासदारांपैकी एक असलेल्या हिंगोलीच्या हेमंत पाटलांचा पत्ता कट झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेमकं शिंदेंनी जाहीर केलेल्या यादीत हिंगोलमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. याशिवाय धाराशिव, परभणीचे काय? याची प्रतीक्षा शिंदेच्या शिवसैनिकांना लागली आहे.

Eknath Shinde and Hemant Patil
Lok Sabha Election 2024 News : शिवसेना शिंदे गटाच्या आठ उमेदवारांची नावे जाहीर; बारणे, मंडलिक, मानेंना उमेदवारी...

शिवसेना शिंदे गटाला एक-एक मतदारसंघ सोडवून घेतांना चांगलीच कसरत करावी लागली हे यादी जाहीर करायला झालेल्या विलंबावरून स्पष्ट होते. आता शिंदे गटाची दुसरी यादी कधी जाहीर होते? आणि त्यात कोणाला उमेदवारी मिळते, कोणाचा पत्ता कट होते हे पहावे लागणार आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, धाराशिव मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा आहे. तर परभणीमध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या दोन्ही मतदारसंघात उमेदवार एका पक्षाचा, चिन्ह दुसऱ्याचे असे धक्कातंत्र वापरले जाऊ शकते.

परभणीत रासपच्या महादेव जानकरांना शब्द देण्यात आला आहे. तर धाराशिवमध्ये माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे भाजपच्या कमळावर लढण्यास इच्छूक असले तरी त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावे लागण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि भाजप (Bjp) यांच्यात अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे-फडणवीस दोघेही या जागेवरचा दावा सोडायला तयार नाहीत. त्यासाठी बैठकांचे सत्र नव्याने सुरू होऊ शकते. संभाजीनगरसह इतर काही मतदारसंघाचा तिढा सोडण्यास उशीर लागू शकतो हे गृहित धरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत आपले नाव असावे यासाठी अनेक इच्छूकांनी देव पाण्यात घातले आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

Eknath Shinde and Hemant Patil
Shrikant Shinde News : विरोधकांच्या हाती आयते कोलीत; उमेदवारांच्या यादीत श्रीकांत शिंदेचे नाव नसल्याने आश्चर्य

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com