मुंबई - महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी ट्विट करत जात व्यवस्थेवर टीका केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती पदापासून ते समान्य नागरिकापर्यंत लागू पडणारे एक उदाहरण दिले. ( Jitendra Awhad gave the example of President and presented the reality of society )
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देशातील जातीयवादावर टीकास्त्र सोडलं आहे. देशात दलित माणसाला राष्ट्रपती होता आलं ही संविधानाने दिलेली देणगी आहे तर दुसरीकडे आपल्याच लग्नात दलित माणसाला घोड्यावर बसता येत नाही. ही देशातील जातीव्यवस्थेची करणी असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
जितेंद्र आव्हाड हे नेहमीच समाजातील जात व्यवस्थेवर टीका करतात. त्यांनी यापूर्वीही जातीच्या मुद्द्यावर आपली रोखठोक मते भाषणांतून व सोशल मीडियावरून मांडली आहेत.
याआधी त्यांनी आंतरजातीय विवाहात मुलांनी बापाची जात लावायची की आईची याच्या निवडीचं स्वातंत्र्य मुलांना द्यावं अशी मागणी केली होती. ते म्हणाले होते की, जात लावताना ती बापाची लावली जाते. बापाची जात बंधनकारक का? आई हा महत्वाचा घटक मग तिची जात का लावता येऊ नये. जात लावताना पाल्याला स्वातंत्र्य द्यावे कुठली जात लावावी आईची की बापाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
याशिवाय आव्हाड यांनी एका नोकरीची जाहिरात ट्वीट करत जातीच्या निकषावर भरती करणाऱ्यांना विरोध केला होता. त्यामुळे आज केलेले ट्विटही त्यांच्या याच भूमिकेचा भाग असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.