'नथुराम गोडसे'च्या टीझरवरुन मांजरेकरांवर आव्हाड संतापले

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टि्वट करुन मांजरेकरांवर संताप व्यक्त केला आहे. आव्हाड आपल्या टि्वटमध्ये विचारणा केली आहे की, महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar)कोण आहेत?
 Jitendra Awhad,Mahesh Manjrekar
Jitendra Awhad,Mahesh Manjrekarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर( Mahesh Manjrekar) यांनी महात्मा गांधी( Mahatma Gandhi) यांची हत्या करणारे नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्यावरी आगामी चित्रपटाची घोषणा केली. यावरुन मांजरेकरांवर समाजमाध्यमांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. 'नथुराम गोडसे'मुळे आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

 Jitendra Awhad,Mahesh Manjrekar
मला खडसेंचा राग नव्हे कीव येते ; महाजनांचा पलटवार

महेश मांजरेकर यांनी काल त्यांच्या नथुराम गोडसे या चित्रपटाचा टीझर सोशलमीडियावरुन शेअर केला आहे. यावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टि्वट करुन मांजरेकरांवर संताप व्यक्त केला आहे. आव्हाड आपल्या टि्वटमध्ये विचारणा केली आहे की, महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय? 'लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं मांजरेकरांचे हे नाटक असल्याचं आरोपही आव्हाडांनी केला आहे.

टीझर शेअर करताना मांजरेकरांनी म्हटलं आहे आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे'.'

“नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिली आहे. अशा पद्धतीच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धाडस लागतं. मी नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कोणतीही तडजोड करु नये यावर विश्वास ठेवला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाहीये किंवा विरोधात बोलायचं नाहीये. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत,'' असे मांजरेकांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com