Jitendra Awhad : सर्वोच्च न्यायालयाचा आव्हाडांना झटका; अनंत करमुसे मारहाण प्रकरणी दिले 'हे' निर्देश

Crime News : आघाडी सरकारने केलेल्या चुका शिंदे फडणवीस सरकार सुधारेल आणि...
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Anant Karmuse Beating Case: राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी न्यायालयाने मोठे निर्देश दिले आहेत. जितेंद्र आव्हाडांसाठी हा मोठा झटका आहे.तसेच सरकारनं या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू ठेवावी आणि तीन महिन्यांच्या आत चौकशीचा अहवाल सत्र न्यायालयात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात राज्य सरकारची या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे. तसेच राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपासाचा अहवाल तीन महिन्यांच्या आत सत्र न्यायालयात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

Jitendra Awhad
Shailaja Darade News : मोठी बातमी! परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंवर नोकर भरती प्रकरणात गुन्हा दाखल

याबाबत अनंत करमुसे म्हणाले, या प्रकरणात माझी पुन्हा तपास करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुन्हा तपास करुन राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. मागील सरकारने या प्रकरणात चुकीचा तपास केला असून त्याचा पुनर्तपास करावा हीच तर माझी मागणी होती. तसेच आघाडी सरकारने केलेल्या चुका शिंदे फडणवीस सरकार सुधारेल आणि मला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे असंही करमुसे म्हणाले आहेत.

Jitendra Awhad
Thackeray Vs Fadnavis : ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष संपणार ? 'जानी दुश्मन' पुन्हा 'जिगरी दोस्त' बनणार ?

काय आहे प्रकऱण?

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले होते. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती.

याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com