भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या ; दोन तोतया NCBच्या अधिकाऱ्यांना अटक

एनसीबी (NCB) अधिकारी असल्याचे सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे. याच टोळीच्या त्रासाला कंटाळून २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.
भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या ; दोन तोतया NCBच्या अधिकाऱ्यांना अटक

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून वीस लाखांची खंडणी मागणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका भोजपूरी अभिनेत्रीने आत्महत्या केली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन जणांना अटक केली आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील कॅप्टन सामंत मार्गावरील हिल पार्क जवळ राहणाऱ्या सलमा ऊर्फ संजना ऊर्फ झारा खातून या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या कटात तिचा मित्र सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे आरोपी ठाण्यातील आसनगाव येथील रहिवासी असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि त्या पाठोपाठ कार्डिलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबी ( NCB) ने कारवाई केल्यानंतर NCB ची दहशत ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या बाँलीवूड कलाकारांमध्ये पहायला मिळाली, मात्र हिच संधी साधून काही जण आपण एनसीबी (NCB) अधिकारी असल्याचे सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे. याच टोळीच्या त्रासाला कंटाळून संजना या २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. तिच्याकडे आरोपींनी २० लाखांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या ; दोन तोतया NCBच्या अधिकाऱ्यांना अटक
चर्चा न करता कृषी कायदे करणं ही हुकुमशाहीच ; पवारांची मोदींवर टीका

याप्रकरणी तपासात गंभीर प्रकार उघड झाला आहे. ही तरूणी तिच्या तीन मित्रांसह कलिना येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी हे त्या ठिकाणी एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत पार्टीत आले आणि अटकेची भीती दाखवत होते. कारवाई न करण्यासाठी आरोपींनी ४० लाखांची मागणी केली. तडजोडी अंती कारवाई न करण्यासाठी २० लाखांना हा व्यवहार ठरला. या पार्टीत अभिनेत्रीसोबत सहभागी असलेल्या आरीफ गाझी याने हा सर्व कट रचला होता.

बदनामी आणि कारवाईच्या भितीने भोजपुरी अभिनेत्री मानसिक तणावाखाली होती. यातूनच तिने जोगेश्वरी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत समोर आले. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी तोतया NCB अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सूरज मोहन परदेशी, आशीर काझी, नोफेल रोहे व सूरजचा साथीदार प्रवीण वाळिंबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंबोली पोलिसांनी सूरज व प्रवीणला अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com