Lok Sabha elections : शिवसेनेच्या 'या' जागांवर भाजपचा डोळा

Lok Sabha elections BJP news : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान 45 जागा जिंकायचा ध्येय भाजपने ठेवले आहे.
J.P. Nadda
J.P. Naddasarkarnama

Lok Sabha elections BJP news : भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मिशन 45 अभियान या आधीच सुरू केले आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठका होत आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व स्थानिक नेतृत्वाच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान 45 जागा जिंकायचे ध्येय भाजपने ठेवले आहे.

यात प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातल्या योजना यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु आहे. मित्रपक्ष शिवसेना सोडून गेल्यानंतर राहिलेल्या एकूण २१२ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये जनता दल आणि महाराष्ट्रात एकत्रित शिवसेनेची पोकळी भरून काढण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेने लढवलेल्या २३ जागांपैकी १२ जागांवर दावा करत एकूण ४० जागा यंदा लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. नव्या समीकरणात शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ८ जागा येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पाच महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला एकनाथ शिंदेंनी आव्हान दिले. शिवसेनेच्या १८ मधील १२ खासदार शिंदेंच्या नेतृत्वात दाखल झाले.

या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली होती. राष्ट्रवादीच्या ताब्यातील रायगड, शिरूर आणि साताऱ्यासाठी तयारी भाजपने सुरू केली आहे.

शिवसेनेच्या या जागांवर भाजपची नजर

हिंगोली, परभणी, पालघर, औरंगाबाद, बुलडाणा, रामटेक, ठाणे, शिर्डी, उस्मानाबाद, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई दक्षिण या सेनेकडील जागांवर भाजपची नजर आहे

गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे असलेल्या औरंगाबादचा मतदारसंघही भाजप लढवणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवून येथेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे भाजपने ठरवले आहे. यासाठी भापजपचे अध्यक्ष. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत २ जानेवारी रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com