Judge Rahul Rokde: सत्ताधारी, आमदार अन् मंत्र्यांविरोधातील खटले अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीशांची बदली

Special Sessions Court Which Hears Cases Against MLA MP: अजित पवार, एकनाथ खडसे, छगन भुजबळ,नवनीत राणा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या खटल्यात राहुल रोकडे हे न्यायाधीश होते.
Judge Rahul Rokde
Judge Rahul RokdeSarkarnama
Published on
Updated on

सत्ताधारी, आमदार आणि मंत्र्यांविरोधातील खटले अंतिम टप्प्यात असताना हे खटले चालवणाऱ्या न्यायाधीशांची बदली झाल्याची माहिती समोर येत आहे.

MP MLA कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे (Judge Rahul Rokde) यांची फोर्ट येथील विशेष न्यायालयातून न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. ते उद्या (सोमवारी) दिंडोशी येथील पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, छगन भुजबळ, माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या खटल्यात राहुल रोकडे हे न्यायाधीश होते.

एकनाथ खडसे हे आरोपी असलेला भोसरी भूखंड गैरव्यवहार आदी घोटाळ्याचे खटले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेला 25 हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय गैरव्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अशातच राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

Judge Rahul Rokde
Mamata Banerjee: ममता बॅनजी अडचणीत; राज्यपालांनी दाखल केला मानहानीचा खटला; काय आहे प्रकरण?

मागील काही वर्षांपासून या खटल्यांची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू होती. नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याविरोधातील हनुमान चालिसा पठणचा खटलाही त्यांच्याच कोर्टात सुरू आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशारा दिला होता. शिखर बँक घोटाळय़ात अजित पवार यांना मुंबई पोलिसांनी दिलेली ‘क्लीन चिट’ ईडीच्या विरोधामुळे लटकली आहे. त्यावर न्यायाधीश रोकडे 12 जुलैला सुनावणी करणार होते. त्यांची आता दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com