Loksabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघात 'कहानी मै Tweest' ; जिजाऊ संघटनेकडून उमेदवार जाहीर!

Palghar Lok Sabha Constituency : कल्पेश भावर यांना पालघर मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Nilesh Sambare
Nilesh SambareSarkarnama
Published on
Updated on

Jijau Sanghatna Nilesh Sambare : पालघर लोकसभा मतदार संघात महायुती आणि बहुजन विकास आडीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. दरम्यान या मतदारसंघात आणखी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाला आहे.

त्यामुळे याठिकाणी निवडणुकीच्या कहणीत एकप्रकारचा ट्वीस्ट आला आहे. भिवंडीमधून काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्न करणाऱ्या निलेश सांभरे यांच्या जिजाऊ संघटनेने पालघरसह सात ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याने हा महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. निलेश सांबरे यांनी पालघर मधून कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर करून पालघरमधील निवडणुकीत रंग भरण्याचे काम केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Sambare
Loksabha Election 2024 : मीरा- भाईंदरमध्ये भाजपला धक्का; 'MNS'चा पाठिंबा घेतल्याने, नाराज उत्तर भारतीय पदाधिकारी ठाकरे गटात!

जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील(Palghar Lok Sabha Constituency) उमेदवाराची घोषणा करण्यासाठी बोईसर येथे पत्रकार परिषद घेत, पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची सभा आयोजित केली होती. सन 2024 लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिजाऊ संघटना ही पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यात इच्छुक असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी भिवंडी, वासिंद, वाडा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, अशा विविध ठिकाणी घेतलेल्या निर्धार मेळाव्यांना मोठ्या संख्येने गर्दी होती.

पत्रकार परिषदेत सांबरे यांनी जिजाऊ संघटने बाबत माहिती देताना सांगितले की, जिजाऊ संघटनेने गेली पंधरा वर्षे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सामाजिक शैक्षणिक आरोग्य अशी अनेक कामे केली आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांना 25 लाख मोफत वह्यांचे वाटप केले जाते सीबीएससी शाळा, नेट प्रशिक्षण वर्ग तसेच, यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण केंद्रातून तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. 45 वाचनालय व अभ्यासिका दिव्यांगांसाठी शाळा 31 पोलीस अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन पाच हजाराहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.

फायर ब्रिगेड अकॅडमी, सर्व सुविधांनी सुसज्ज असेच झाडपोली येथे 130 बेडचे रुग्णालय येथे सर्व मोफत सेवा दिली जाते. 18 रुग्णवाहिका आज मोफत सेवा देत आहेत संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण विभाग अंतर्गत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. हे सर्व उपक्रम कोणतेही शासकीय मदत न घेता समाजासाठी मोफत स्वरूपात स्वखर्चातून आम्ही करीत आहोत. या सामाजिक कामांमुळे मतदार आम्हाला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

नीलेश सांबरे यांनी आपला उमेदवार निवडणुकीत उभा केल्याने तो कोणाची मते खाणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. सांबरे यांची ताकद ही ग्रामीण भागात म्हणजे विक्रमगड,, जव्हार, वाडा ,मोखाडा आणि थोडीफार पालघरमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा फटका कोणाला बसणार हे काही दिवसांतच दिसेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com