Kalyan: गोविंदाच्या हातातील बॅनर पाहताच माजी आमदार भावुक; कल्याणमध्ये विकासाचा नवा अध्याय', ठाकरे बंधूंचे माजी आमदार एकत्र

Mumbai Dahi Handi 2025 Subhash Bhoir with Raju Patil in Kalyan banner Displayed: डोंबिवली एकनिष्ठ मित्र मंडळाच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली.
 Subhash Bhoir with Raju Patil in Kalyan banner Displayed
Subhash Bhoir with Raju Patil in Kalyan banner DisplayedSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली: हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहे. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा उत्साह दहीहंडीतही दिसून आला.

कल्याण ग्रामीणमध्ये उद्धव ठाकरेंचे माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे एकत्रित फोटो बॅनरवर झळकवत, गोविंदा मंडळाने कल्याण लोकसभा आणि कल्याण ग्रामीण विकासाचा नवा अध्याय असा संदेश दिला आहे. यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये त्याची चर्चा सुरु झाली आहे.

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश मागे घेतला. ज्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले होते. त्यानंतर ते महापालिका निवडणूक एकत्र लढवतील का? याची जोरदार चर्चा सुरु होती. यानंतर संजय राऊत यांनी ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढतील असे स्पष्ट सांगून टाकले आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे तसेच ठाकरे गटाची ताकद आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता दोन्ही ठाकरे बंधू कल्याण डोंबिवली सुद्धा एकत्र लढले तर येथे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे ताकद वाढू शकते. खासदार राऊत यांनी मुंबई महापालिका एकत्र लढणार असल्याचे संकेत दिल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील ठाकरे बंधू एकत्र लढतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

 Subhash Bhoir with Raju Patil in Kalyan banner Displayed
Padmakar Valvi: माजी मंत्री, आदिवासी नेते पुन्हा स्वगृही परतले! काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का

कार्यकर्त्यांचा हा उत्साह दहीहंडी उत्सवात देखील दिसला. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ चौकात शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख गीतेश म्हात्रे यांच्या एकनिष्ठ मित्र मंडळाच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली. यावेळी कोकण बोईज गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिली.

सर्वात लहान गोविंदाने हातात घेतलेल्या बॅनर वरील आशयाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बॅनर वर कल्याण ग्रामीणचे दोन्ही माजी आमदार सुभाष भोईर व मनसेचे राजू पाटील यांचे फोटो एकत्रित झळकवण्यात आले होते. तसेच कल्याण लोकसभा व कल्याण ग्रामीण विकासाचा नवा अध्याय असा संदेश देखील यावर लिहिण्यात आला होता.

माजी आमदार भोईर यांना देखील आपला आनंद लपवता आला नाही. त्यांनी देखील हसत या मंडळाचे स्वागत केले. राजकीय वर्तुळात मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रित लढतीची एकच या बॅनरमुळे चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com