Kalyan Dombivli News : रिपाइंचे नेते ऑन फिल्ड, ओस पडलेले कार्यालय अखेर गजबजले

Kalyan Dombivli Rpi Athavale Group Politics : ओस पडलेल्या कार्यालयात शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांची नव्या जोमाने सुरुवात...
Kalyan Dombivli Rpi Athavale
Kalyan Dombivli Rpi AthavaleSarkarnama

Kalyan Lok Sabha Constituency Politics News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी या मतदारसंघात दौरा केला होता. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री Eknath Shinde आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि कॅबिनेट रवींद्र चव्हाण या मतदारसंघात जातीने लक्ष देत आहेत.

असे असले तरी महायुतीचा मित्र पक्ष असणाऱ्या रिपाइंचे नेमके काय सुरू आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नेते कुठे आहेत असा सवाल? सरकारनामाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर डोंबिवलीचे रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड पुन्हा एकदा त्यांच्या कार्यालयात रुजू झाले आहेत. इतकेच नव्हे तर अनेक कार्यकर्ते काम करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

Kalyan Dombivli Rpi Athavale
BSUP Housing Scheme : चाव्या प्रकल्पग्रस्तांना, कब्जा भूमाफियांचा! कल्याण डोंबिवलीत चाललंय तरी काय?

गेल्या वर्षभरात डोंबिवलीचे कार्यालय होते ओस

कल्याण जिल्हाध्यक्ष पदी प्रल्हाद जाधव तर डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांची वर्णी लागली आहे. सुरुवातीला काही दिवस डोंबिवली आणि कल्याणमध्येदेखील पक्षाकडून छोटे छोटे कार्यक्रम राबविले जात होते. मात्र, गेल्या वर्षभरात डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांची तब्येत बरी नसल्याने केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झालेले गायकवाड यांचे कार्यालयदेखील ओस पडले. शहराध्यक्ष नसल्याने कायम भरलेल्या या कार्यालयाचे दिवे लावयालाही कार्यकर्ते फिरकत नव्हते.

बंद पडलेले काम पुन्हा सुरू...

आता पुन्हा रिपाइंचे डोंबिवली शहराध्यक्ष कार्यालयात येत असल्याने. कार्यालय भरलेले दिसत आहे. असे असले तरी तब्येत बरी नसल्याने बंद पडलेले गायकवाड यांचे काम आता परत कशा पद्धतीने सुरू होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या दहा वर्षांत एकही नगरसेवक नाही

गेल्या दहा वर्षांत रिपाइंचा एकही नगरसेवक महापालिकेत निवडून आलेला नाही. त्याआधी आत्ताचे रिपाइंचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी नगरसेवक पद भूषविले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत म्हणजेच जवळपास दोन टर्म त्यांचा एकही नगरसेवक निवडून गेला नाही. मात्र, असे असले तरी भाजप युतीमध्ये असल्याने आमची सर्व मत भाजपच्या नगरसेवकांना मिळाली, असे पक्षातील कार्यकर्ते सांगतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षभरात एकही कार्यक्रम नाही

कल्याण जिल्हाध्यक्ष पदी प्रल्हाद जाधव तर डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांची वर्णी लागली आहे. सुरुवातीला काही दिवस डोंबिवली आणि कल्याणमध्येदेखील पक्षाकडून छोटे छोटे कार्यक्रम राबविले जात होते. मात्र, गेल्या वर्षभरात डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांची तब्येत बरी नसल्याने केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झालेले गायकवाड यांचे कार्यालयदेखील ओस पडले, तर कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनीदेखील वैयक्तिक कामात लक्ष गुंतवल्याने पक्षाचे काम मागे पडले, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. रिपाइंचे कार्यकर्ते सध्या आहेत तरी कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले येतात आणि कार्यकर्त्यांना बळ देतात

अधून मधून रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले येतात आणि पक्षाला बळ देतात. तीन ते चार महिन्यांपूर्वी आठवलेंनी कल्याण येथे भेट दिली होती. मात्र, आठवले यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होताना दिसते. असे असले तरी महायुतीला साथ देणारा रिपाइं हा मित्र पक्ष सध्या निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीतमध्ये किती सक्षम आणि सक्रिय आहे, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

R

Kalyan Dombivli Rpi Athavale
Ganpat Gaikwad Firing Case : त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होती; पण आयत्या वेळीच्या निरोपाने कार्यकर्ते हिरमुसले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com