Shrikant Shinde : राज ठाकरे यांच्या खारेगावमधील सभेकडे लक्ष, डॉ. श्रीकांत शिंदेंनी दिले मोठे संकेत

Kalyan Loksabha : मनसे आणि शिवसेनेने एकत्रित प्रचार करण्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, 'कार्यकर्त्यांसोबत राहून आम्हाला असं वाटत नाही आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत आहोत.
Thackeray, Shrikant Shinde
Raj Thackeray, Shrikant ShindeSarkarnama

Loksabha Election : मनसे प्रमुख राज ठाकरे कल्याण आणि ठाणे मतदारसंघातील उमेदवारांठी आज (रविवारी) जाहीर सभा घेणार आहे. कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत. ठाणे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजप पेक्षा मनसे झपाटून कामाला लागली आहे. त्यातच 'काही दिवसांपूर्वी आम्ही एकत्र आलोत पण आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत असे वाटत नसल्याची भावना डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी व्यक्त केली असून भविष्यात देखील आम्ही एकत्र असू असे संकेत दिले आहेत.

Thackeray, Shrikant Shinde
Thane Lok Sabha : ठाणे लोकसभा भाजपनेच लढावा, अशी फडणवीसांची इच्छा होती; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

कल्याण ग्रामीण भागात महायुतीचा जोरदार प्रचार सुरू आहे. मनसेचे आमदार राजू पाटील खासदार डॉ. शिंदे यांच्यासोबत पायाला भिंगरी लावून मेळावे, रॅली, प्रचार सभा करत आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांची सभा देखील आज (रविवारी) होत आहे. याविषयी श्रीकांत शिंदे म्हणाले, राज ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद. आज ते खारेगाव मध्ये कल्याण व ठाणे लोकसभा Thane Loksabha या दोन्ही मतदार संघासाठी सभा घेणार आहेत. मी आणि आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर जनता देखील उत्सुक आहे.

संध्याकाळी ते नेमकं काय मार्गदर्शन करणार हे ऐकण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. त्याप्रमाणे याची तयारी देखील जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यात असल्यामुळे राज ठाकरे हे सभेचे प्रमुख मार्गदर्शक असतील. राज ठाकरे यांच्या सभेला 60 ते 70 हजार पेक्षा अधिक लोक येतात. त्याप्रमाणे आम्ही तयारी देखील केलेली आहे, असे देखील श्रीकांत शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे आणि शिवसेनेने एकत्रित प्रचार करण्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, 'कार्यकर्त्यांसोबत राहून आम्हाला असं वाटत नाही आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत आहोत. आता एकत्र येण्यामध्ये बिलकुल त्रास झालेला नाही.त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांचे सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. मतभेद असू शकतात मनभेद पार्टीमध्ये, कार्यकर्त्यां मध्ये येऊ देऊ नका. कितीही मतभेद जरी आमच्या मतदारसंघात असतील तरी आज सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि आम्ही भविष्यात देखील एकत्र काम करत राहू.'

(Edited By Roshan more)

Thackeray, Shrikant Shinde
Bharati Pawar : दिंडोरीसाठी PM मोदींचा अनोखा संदेश; भारती पवार नेमकं काय म्हणाल्या?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com