Raj Thackeray News : "राज ठाकरेंची मोदी-शाहांच्या मांडीला मांडी; प्रबोधनकार, बाळासाहेबांना काय वेदना होत असतील!"

Nashik Lok Sabha Election 2024 : कधीकाळी मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असे म्हणणारे राज ठाकरे भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात कसे?
Raj Thackeray Latest Speech
Raj Thackeray Latest Speech Sarkarnama

Nashik News : लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. उद्या (13 मे) रोजी मतदान पार पडणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिक येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेत फूट पाडल्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपला प्रभाव सिद्ध करण्यासाठी जोरकसपणे प्रचारात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या महायुतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील साथ दिली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या विरोधात एकाकी लढत आहे. त्यावर शिवसेना नेते राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र विरुद्ध कारस्थान करीत आहेत. महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प आणि कार्यालय गुजरातला हलविले जात आहेत. अशा स्थितीत कधीकाळी मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असे म्हणणारे राज ठाकरे भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात कसे? असा प्रश्न राऊत यांनी नाशिक येथे केला आहे.

Raj Thackeray Latest Speech
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

देशात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाने देशासाठी निर्माण केलेल्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. देशाची राज्यघटना वाचवावी यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत. मतपेटीतून परिवर्तन घडविण्यासाठी एकत्र येत आहेत. अशावेळी राज ठाकरे यांच्यासारखे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर, प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील, असा प्रश्न राऊत यांनी राज ठाकरे यांना केला. या निमित्ताने त्यांनी राज ठाकरे यांचे राजकारण उघडे पाडले आहे.

Raj Thackeray Latest Speech
Lok Sabha Election 2024 : माढा-सोलापूरमध्ये लोकशाहीचा उत्सव
Raj Thackeray Latest Speech
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी सांगितला आंध्र प्रदेशमधील 'BJP'चा अर्थ, म्हणाले...

शिवसेना नेते खासदार राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार राऊत यांनी वारंवार राज ठाकरे यांना दिवस झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे त्याला काय उत्तर देतात हा प्रश्न मनसेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनाही पडला आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com