Ganesh Visarjan 2023 : राज्यमंत्री कपिल पाटलांसह भाजप नेते ठरले 'बाप्पा'च्या मार्गात अडथळे; राजू पाटील म्हणाले, "राजकीय मुजोरीचे...

Kalyan MNS news : अडथळा निर्माण करणाऱ्या या कमानीमधून कसेबसे गणपती बाप्पाला पुढे काढत भक्तांनी बाप्पाचा मार्ग मोकळा केला.
Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023 Sarkarnama
Published on
Updated on

Dombivali : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कल्याणमध्ये आलेल्या लाखो गणेशभक्तांना आणि मंडळांना राजकीय नेत्यांच्या कमानी अडथळा ठरल्या. या कमानी एकीकडे वाहतुकीला अडथळा ठरत असतानाच कमानींनी चक्क बाप्पाची वाट अडवल्याचे चित्र कल्याणमध्ये दिसून आले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपमधील अनेक मान्यवरांचे फोटो कमानीवर होते.

कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकात कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या वतीने कमानी लावण्यात आल्या होत्या. या कमानीवर महामंडळचे अध्यक्ष राकेश मुथा यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती झळकल्या होत्या. राज्यमंत्री कपिल पाटील यांसह भाजपमधील अनेक मान्यवरांचे फोटो या कमानीवर होते.

राकेश मुथा यांची नुकतीच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या वतीने जोरदार जाहिरातबाजी केली गेली. या कमानीमुळे वाहनचालकांना त्रास झाला. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण झाला होता. अडथळा निर्माण करणाऱ्या या कमानीमधून कसेबसे गणपती बाप्पाला पुढे काढत भक्तांनी बाप्पाचा मार्ग मोकळा केला.

Ganesh Visarjan 2023
Udayanraje Bhosale News: उदयनराजे पुन्हा कॉलर उडवणार का? राजेंच्या स्टाइलची दिल्लीत चर्चा..

नेत्यांनी कमानी लावण्याआधी वाहतूक तसेच गणेशमूर्ती, देवीच्या मूर्ती आणताना, नेताना काही अडथळा निर्माण होणार नाही याकडे प्रशासनाने पाहिले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागच्या वर्षी अशाच कमानी पडल्याने अपघात झाला होता. काही वाहनांचे नुकसान झाले होते. कमानी लावताना पालिका प्रशासनाची परवानगी घेतली जाते का, हा संशोधनाचा विषय असून, यावर पालिका अधिकारी चुप्पी साधत आहेत. परवानगी घेतली असल्याचे तोंडी बोलले जाते. मात्र, अधिकृतरित्या काही सांगितले जात नाही.

काल शहरभर वाजतगाजत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय नेत्यांनी सण उत्सवांच्या शुभेच्छा देणाऱ्या भल्या मोठ्या लोखंडी कमानी लावल्या होत्या. कमानी लावत आपली जाहिरात करण्याची जणू स्पर्धाच नेत्यांमध्ये लागली असल्याचे चित्र आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट - ठाकरे गट आणि काही प्रमाणात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या कमानी लावण्यात आल्या होत्या. गणपती उत्सवात झालेल्या या प्रकारानंतर नवरात्र उत्सवात तरी प्रशासन या राजकीय कमानीकडे लक्ष देतील का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

राजकीय कमानींचा व्हिडिओ मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टि्वट करीत बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे. "हे गणराया पुढल्या वर्षी आपल्या आगमनापूर्वीच यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्याच खाडीत विसर्जन करून इथल्या नागरिकांना सुखाचे व आनंदाचे दिवस दिसू दे," असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

"गेल्या वर्षी राजकीय नेत्यांनी लावलेल्या कमानी पडून अपघात झाले होते. परंतु त्यावरून कोणताही शहाणपणा या राजकीय नेत्यांना आणि पालिका प्रशासनाला आला नाही. आता तर थेट बाप्पाच्या मिरवणुकीत अडवणूक या कमानीने करून ठेवली आहे," राजू पाटील यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. गणेश विसर्जनाच्या मार्गावर अशा प्रकारच्या कमानी लावू नयेत, अशी मागणी नागरिकांसह गणेशभक्तांनी केली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Ganesh Visarjan 2023
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे साहेब धाब्यावर या ना! तारीख ठरली, खासदार मेंढेंना दिले निमंत्रण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com