Raj Thackeray: महाराष्ट्र माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न, खुर्चीचा नाही; थट्टेचा विषय होता कामा नये!

Kalyan Rural Assembly Constituency election 2024: रस्ते नाहीत, पाणी नाही पण आपण याचा आमदार, खासदारांना जाब विचारत नाही ? भोळचटासारखे उन्हात उभे राहून गुलामासारखे त्यांना मतदान करतो.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारार्थ दिवा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सध्याच्या राजकारणावर व सत्तांतरावर राज यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी सव्वाशे वर्षे येथे राज्य केले. शिवाजी महाराजांचे ते गतवैभव परत आणायचे आहे. महाराष्ट्र हा थट्टेचा विषय होता कामा नये असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले "महाराष्ट्राचे स्वप्न पाहणारा मी माणूस आहे. येथील नागरिकांना सुखी समाधानाचे जीवन जगता येईल याचा मी विचार करतो. तो माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो काही खुर्चीचा प्रश्न नाही, किंवा मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी नाही. आत्ता जे राजकारण सुरू आहे ती शिवी वाटते मला. जे बेढब चित्र दिसत आहे राज्यात ते अत्यंत लाजिरवाणे असून महाराष्ट्राला यातून मला बाहेर काढायच आहे,"

Raj Thackeray
Sharad Pawar : शरद पवारांच्या बहिणीचा पक्का निश्चय! मला मुश्रीफांना पाडायचंय; भाऊ राज्यभर फिरत असताना मी घरी कशी बसू?

गेले 30 ते 40 वर्षे रस्ते, वीज, पाणी यावर निवडणूका लढल्या जात आहेत. मूलभूत गरजाच आपल्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यातून बाहेर पडलो तर पुढचा विचार करु ना ? असे म्हणत राजकारणी त्याच त्याच मुद्द्यांवर नागरिकांना खेळवत असून शहरांचा विकास झालेला नाही हे त्यांनी अधोरेखित केले.

फेरीवाल्यांना विशिष्ट जागा मिळत नाही, रस्ते अडवून काही होणार नाही. पण आमच्याकडे वेळच नाही या गोष्टींचा विचार करायचा. भविष्यात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्यासाठी काय शिक्षण आहे याची आपल्या तरुणांना माहिती नसते. आपण केवळ निवडणुका आल्या की हा काय बोलला तो काय बोलला यातच अडकतो आणि निवडणूक निघून जाते. आयुष्यातील पाच वर्षे आपली अशीच निघून जातात. आपल्या हातात काय येत, कधीतरी गांभीर्याने निवडणुकीचा विचार होणार का? आपण करदाते आहोत आपल्याला नीट रस्ते मिळत नाही हा आपल्या मताचा अपमान तुम्हाला वाटत नाही का ? अशा शब्दात त्यांनी मतदारांना खडे बोल सुनावले.

Raj Thackeray
MNS News : दोन भावांची परीक्षा फी भरणं मनसे उमेदवाराच्या आलं अंगलट ; निवडणूक आयोगाची नोटीस

तुम्ही थंड बसता त्याचाच गैरफायदा ही मंडळी घेतात. ट्रेनमधून पडून माणसं मरतात, शेतकरी आत्महत्या करतात याचे कोणाला काही पडलेले नाही. माणसांची किंमतच राहिलेले नाही. रस्ते नाहीत, पाणी नाही पण आपण याचा आमदार, खासदारांना जाब विचारत नाही ? भोळचटासारखे उन्हात उभे राहून गुलामासारखे त्यांना मतदान करतो. आपण राजकारण्यांचे नोकर आहोत का ? असा सवाल देखील त्यांनी मतदारांना केला.

लोकल प्रवासावर बोलताना म्हणाले लोकलचा प्रवास काय हालाखीचा असतो याची मला कल्पना आहे. दुसऱ्याच्या जीवावर बोलू नये पण बोलतो येथे आमदार आमचा आला तर पुढे दिवा ते सीएसएमटी एक लोकल सुरू करू असे राज ठाकरे बोलताच नागरिकांनी टाळ्या वाजवल्या.

कल्याण पश्चिमचे उमेदवार उळस भोईर यांच्या प्रचारार्थ देखील राज यांची कल्याण मध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी आत्ताच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तमाशा मांडला आहे आपण सर्व गेली पाच वर्ष हे पाहत आहोत. या राज्यकर्त्यांनी करून ठेवलेल्या चिखलातून आपल्याला महाराष्ट्र बाहेर काढायचा असेल तर कल्याणसह राज्यातील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणात केले.

राज ठाकरे म्हणाले की, आपल्यामध्ये काही मतभेद असतील तर ते गाडून टाका. कारण त्यांच्यातील मतभेदांपेक्षा हा महाराष्ट मोठा आहे. हा महाराष्ट्र आपल्याला ठीकठाक करायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व मनसे उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. 20 तारीख अत्यंत महत्वाची असून आपण सर्वांनी अजिबात गाफील न राहण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी कल्याण येथील आपले भाषण आटोपते घेत पुढील उल्हासनगर येथील जाहीर सभेसाठी रवाना झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com