MNS News : ...तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, मनसेच्या माजी आमदाराचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Maharashtra Politics News : कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहे. त्यावरुन मनसेचे नेते कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Traffic jam on Kalyan Sheel Road
Traffic jam on Kalyan Sheel RoadSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News | कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी किती अंत पाहणार? असा सवाल प्रशासनाला उपस्थित केला जात आहे. या समस्येवरून मनसेचे नेते कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी 'एक्स' पोस्ट केली असून त्यातून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे. परिस्थिती सुधारली नाही तर रस्त्यावर उतरु असा असा इशारा त्यांनी दिला आहे.

कल्याण शीळ रोड रोडचे अनेक भागात रुंदीकरण काम रखडल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. अवघा 1 किमी अंतराचा टप्पा गाठण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त असून त्यांचा संताप होतो आहे.

सहा लेनचा हा मार्ग होणार आहे. मात्र या रखडलेल्या कामामुळे केवळ चार लेनचाच मार्ग तयार झाला आहे. यातच लोकसभा निवडणुकीनंतर या मार्गावर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्याच्या मध्य भागातील दोन लेन या पत्रे लावून बंद करण्यात आल्या आहेत.

बुधवारी सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस अडकल्याने शाळा प्रशासनाला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सहा महिन्यांच्या कालावधीत तिसऱ्यांदा घ्यावा लागला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस, रुग्णवाहिका, चाकरमानी यांचे दररोज हाल होत आहेत.

याच समस्येवरून कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी 'एक्स' पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच परिस्थिती सुधारली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

राजू पाटील यांची नेमकी एक्स पोस्ट काय?

कल्याण-तळोजा मेट्रॉ ना येथील नागरिकांच्या फायद्यासाठी आहे ना या परिसरातील विद्यार्थ्यांच्या ! ही मेट्रो फक्त आणि फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी व याप्रकल्पातून मिळणाऱ्या टक्केवारी साठी येथे आणली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

एकीकडे कल्याण-शीळ रस्त्याच्या तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन झाले नाही, दुसरीकडे ठेकेदारांना द्यायला पैसे नाहीत म्हणून पलावा पुल रखडला आहे. तरीही या प्रकल्पाचेही पुर्ण भूसंपादन झाले नसताना लोकसभेच्या तोंडावर लोकांना खोटा विकास दाखविण्यासाठी काम सुरू करण्यात आले. या ‘बिल्डरांच्या मेट्रॅासाठी’ विद्यार्थी, पेशंट , नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस नेण्याचे काम सुरू आहे.

आज या कामांमुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमूळे काही शांळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या याचे कोणालाच सोयरसुतक नाही? आमचे पालकमंत्री तर फक्त बालकाच्या कार्यक्रमाला सायरन वाजवत येतात, इतर वेळी त्यांनाही काही पडली नाही…खरंतर या अनागोंदीला त्यांचाच इतक्या वर्षातला विकासाच्या नावाने चाललेला हा गोंधळ कारणीभूत आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल अशी 'एक्स' पोस्ट मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com